महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटकचा डल्ला”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं कर्नाटकची चोरी उघड केली

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुर आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कर्नाटकवर टीका केल्याने कर्नाटक सरकार आता काय निर्णय घेतं त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटकचा डल्ला; राष्ट्रवादीच्या नेत्यानं कर्नाटकची चोरी उघड केली
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 11:40 PM

सोलापूर : काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका मंत्र्याने सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला होता. तर आता आणखी नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या औज बंधाऱ्यातून कर्नाटक सरकार पाणी चोरत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप केल्याने सीमाभागातील राजकारण आता तापले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कर्नाटक हद्दीतील इंडी तालुक्यातील मरगूर या गावाजवळ 570 हॉर्स पॉवर क्षमतेच्या पंप हाऊसद्वारे हाऊस बंधाऱ्यातून पाणी उपसा करण्यात येत आहे.

सोलापूर महापालिका या पाण्यासाठी कोट्यवधी रुपये जलसंपदा विभागाला भरत असते मात्र कर्नाटक सरकार बिनधास्तपणे पाणी उपसा करून नागरिकांना पुरवत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

कर्नाटकच्या या पाणी चोरीमुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे राज्य शासनाने याबाबत उपाययोजना करून सोलापूरकरांना पाणी दिले पाहिजे अशी मागणी जयंत पाटील यांनी विधानसभेत केली आहे.

दरम्यान या आरोपानंतर महापालिका प्रशासन तसेच राज्य शासन तोडगा काढते की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारची चोरी उघडपणे सांगितल्यामुळे आता सीमावाद चिघळणार की कर्नाटक सरकार त्यावर प्रत्युत्तर देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला जात आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुर आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कर्नाटकवर टीका केल्याने कर्नाटक सरकार आता काय निर्णय घेतं त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.