Solapur Crime : सोलापूरमध्ये 16 महिन्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आई-वडिलांना फाशीची शिक्षा

सिकंदाराबाद येथे कामगार असणाऱ्या पित्याने आपल्या मुलीवर बापानेच अनैसर्गिक अत्याचार केला होता. त्यानंतर तिला अल्कोहोल पाजून तिचा गळा आवळून खून केला होता.

Solapur Crime : सोलापूरमध्ये 16 महिन्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आई-वडिलांना फाशीची शिक्षा
सोलापूरमधील 16 महिन्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आई-वडिलांना फाशीची शिक्षाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 6:58 PM

सोलापूर : पोटच्या 16 महिन्याच्या मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) करणाऱ्या बापा (Father)ला आणि तिच्या आई (Mother)ला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सिकंदाराबाद येथे कामगार असणाऱ्या पित्याने आपल्या मुलीवर बापानेच अनैसर्गिक अत्याचार केला होता. त्यानंतर तिला अल्कोहोल पाजून तिचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस रेल्वेतून जात असताना प्रवशांना संशय आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना याबाबत कल्पना दिली. याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयाने पाच महिन्यात सोलापूर सत्र न्यायालयाने या प्रकरणावर शिक्षा सुनावली. धोलाराम बिष्णोई आणि पुनिकुमारी बिष्णोई अशी नराधम आई-वडिलांची नावे आहेत.

याप्रकरणी 4 जानेवारी 2022 रोजी सोलापुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेले होते. अवघ्या 9 दिवसात तब्बल 31 साक्ष सरकारी पक्षाच्या तपासण्यात आले. रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका महिलेची नेपाळवरून देखील साक्ष घेण्यात आली. गुन्हा अतिशय गंभीर आणि क्रूर असून कोणतीही दया दाखवू नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायधीश यु. एल. जोशी यांनी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

काय आहे प्रकरण ?

सोळा महिन्याच्या मुलीवर बापानेच अनैसर्गिक अत्याचार करुन गळा आवळून तिची हत्या केल्याची घटना 3 जानेवारी 2022 रोजी घडली होती. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमधून पती-पत्नीला ताब्यात घेतले. याप्रकरणी, सोलापूर लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी फिर्याद दिली आहे. मृतदेहाचा वास येऊ नये अथवा कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसच्या एसी डब्यातून प्रवास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

मात्र, सिकंदराबादपासून बाळ रडत नाही, उठत नाही यामुळे डब्यातील प्रवाशांचा संशय बळावला. त्यानुसार प्रवाशांनी तिकीट निरीक्षकला याची माहिती दिली. त्यानंतर गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर आली असताना पती पत्नीला खाली उतरवून चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी बाळ आजारी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी बाळाचा ताबा घेऊन तपासणी केली असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच, बाळाच्या मृतदेहाची मेडिकल टेस्ट केली असता अनैसर्गिक अत्याचार करत गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक केली. (Parents sentenced to death for abusing And murder of 16-month-old girl in Solapur)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.