Praniti Shinde : देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा लोकसभेवेळी सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन, खासदार प्रणिती शिंदेंचा खळबळजनक आरोप

Praniti Shinde On Devendra Fadnavis: काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. फडणवीस यांचा सोलापूरमध्ये दंगल घडविण्याचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

Praniti Shinde : देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा लोकसभेवेळी सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन, खासदार प्रणिती शिंदेंचा खळबळजनक आरोप
फडणवीसांवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 5:03 PM

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता.लोकसभेच्या मतदानाआधी दोन दिवस दंगल घडवणार होते, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत शाब्दिक दंगल घडणार हे निश्चित आहे.

भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात बोलताना खासदार शिंदे यांनी भाजपवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. ही लोकं रक्ताने राजकारण करतात. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे, असा हल्लाबोल खासदार शिंदे यांनी केला. या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी यावेळी भाजपचे जे आमदार मतदारसंघात फिरले नाही, त्यांचे आभार मानले.

हे सुद्धा वाचा

त्यांचा होता दंगल घडविण्याचा प्लॅन

त्यावेळेस ते गावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते, असा आरोप त्यांनी फडणवीस यांच्यावर केला. ते कानात सांगितलं गेलं होतं.मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं. सीपीनी सांगितलं होतं जा बाहेर नाहीतर उमेदवारावर एफआयआर करावा लागेल. त्यावेळेस भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं.त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, असे शिंदे म्हणाल्या.

मग भाजप आणि दहशतवाद्यात काय अंतर?

संविधान संपविण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने चपराक लावली. भाजप आणि दहशतवाद्यांमध्ये काय फरक आहे? हे देशात राहून भांडण लावत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सोलापुरात दंगली घडविण्याची योजना होती. भाजपने किती पैसे वाटप केले. एक साडी आणि 500 रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला. पैसे दिले तरी तुम्ही त्यांना मतदान केले नाही, असे त्या सभेला उद्देशून म्हणाल्या. त्यांच्या आरोपाने आता एकच खळबळ उडाली आहे.

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.