खासगी बस, ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी

बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा  जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खासगी बस, ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 7:42 AM

सोलापूर : बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा  जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. बार्शी शहर परिसरात तिरकस पुलाजवळ ही घटना घडली.

जखमींवर रुग्णालयात उपचार

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी-कुर्डुवाडी रोडवर असलोल्या तिरकस पुलानजीक समोरून येणाऱ्या भरधाव बसने उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये  दोन जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मृतांची नावे अद्याप समोर येऊ शकलेली नाहीत.

वाहनांचे नुकसान

दरम्यान या अपघातामध्ये वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. समोरासमोर धडक झाल्याने दोनही वाहनांचा समोरचा भाग डॅमेज झाला आहे. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमींना रुग्णालयात हलवण्यानंतर पुन्हा एका वाहतूक सुरळीत सुरू झाली.

संबंधित बातमी 

AIMIM Rally: राहुल गांधी मुंबईत येणार आहेत, तेव्हा 144 कलम लावणार का?; ओवेसींचा ठाकरे सरकारला सवाल

‘ये तो सिर्फ गुर्राना था, अभी दहाड बाकी है’, खासदार इम्तियाज जलील यांचा मुंबईतून ठाकरे सरकारला इशारा

VIDEO: महापौरांना धमकीचं पत्रं, शंकाकुशंका आणि पडसाद दुसऱ्या दिवशीही!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.