वादळी पावसात द्राक्षबाग जमीनदोस्त; सोलापुरात शेतकरी पावसामुळे हवालदिल; शाळेचेही पत्रे उडाले

चानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कासेगावात काल मध्यरात्री अचानकपणे वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर काहीवेळ गारपिटही झाली, त्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले द्राक्षपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी पावसात द्राक्षबाग जमीनदोस्त; सोलापुरात शेतकरी पावसामुळे हवालदिल; शाळेचेही पत्रे उडाले
दक्षिण सोलापुरातील कासेगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसानImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 10:23 PM

सोलापूर: सोलापुरात रविवारी झालेल्या वादळ आणि गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) शेतीपिकांसह राहते घर तसेच शाळेचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावामध्ये (South Solapur Kasegaon) प्रचंड मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कासेगावात काल मध्यरात्री अचानकपणे वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर काहीवेळ गारपिटही झाली, त्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले द्राक्षपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीच्या माऱ्यामुळे विक्रीला आलेल्या द्राक्ष (Grapes) बागेतील द्राक्षांचे घड फुटल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या किचनशेडचे पत्रे, नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गावातील वीज डेपोदेखील उन्मळून पडल्याने काल मध्यरात्रीपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

नुकसान भरपाईचे आश्वासन

या पावसामुळे जिवीतहानी झालेली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्याप्रमाणात झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान या नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर दुपारच्या सत्रात गावतलाठी तसेच विभागीय अधिकारी आणि आमदारांनी गावाला भेट देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामेदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

नुकसानीची पाहणी तात्काळ पंचनामे:

कासेगावमधील बिरोबा वस्ती येथे काल संध्याकाळी सात वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले आहे. यामध्ये बिरोबा वस्तीमधील शाळेच्या स्वयंपाक खोलीचे पत्रे उडाले असून गावातील सुमारे तीस ते पस्तीस घरावरील पत्रे उडाले आहेत. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. यामध्ये खाद्यपदार्थ, गहू, ज्वारी यासारख्या अनेक अत्यावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून शासकीय पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून गावकामगार तलाठी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून पंचनामे करून घेत आहेत. त्याचबरोबर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीदेखील गावाला भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले असल्याचे सरपंच सुरेखा काळे यांनी सांगितले.

हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावला:

द्राक्ष बागायत शेतकरी शिवाजी चौगुले यांनी सांगितले की, मी मागील वर्षी द्राक्षबाग लावली होती, कष्ट करुन ती वाढवली होती. या बागेसाठी मी 7 ते 8 लाख रूपये खर्च केले होते. पुढील दोन दिवसात माझी द्राक्षे व्यापारी घेऊन जाणार होता. मात्र अचानक काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्या गारपिटीमुळे माझ्या द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने तात्काळ मला मदत मिळाली तर शेतीचे नुकसान भरुन निघणार आहे.

संबंधित बातम्या

काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु

Ola-Uber : ‘उबेर’चा प्रवास 12 टक्क्यांनी महागला, उबेर-‘ओला’च्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

Anil Parab : कामगारांकडून उकळलेला पैसा बाहेर निघणार का?, अनिल परब म्हणतात…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.