सोलापुरातल्या “चिमणी”वरून पुन्हा चिवचिव, प्रकरणात शरद पवारांचं नाव समोर

चिमणीमुळे गेल्या कित्येक वर्षापासून सोलापूर विमानतळाहून वाहतूक बंदच आहे. आणि आता या प्रकरणात आणखी एक नवं ट्विस्ट आलं आहे. सोलापूर विमानतळाला अडथळा ठरणाऱ्या चिमणीबाबत धक्कादायक माहिती समोर चिमणी पाडकामाला खुद्द ज्येष्ठ नेते शरद (Sharad Pawar) पवारांनी ब्रेक लावला असल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापुरातल्या चिमणीवरून पुन्हा चिवचिव, प्रकरणात शरद पवारांचं नाव समोर
शरद पवार
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:33 PM

सागर सुरवसे, प्रतिनिधी, सोलापूर : गेल्या कित्येक वर्षापासून सोलापूर विमानतळाची (Solapur Airport) अवस्था म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच झाली आहे. कारण सोलापुरात विमानतळ तर आहे, पण विमानात बसायची आणि सोलापुरातून उड्डाण घ्यायची सोलापूरकरांची इच्छा अजूनही अधुरीच आहे. अजून किती दिवस विमानतळाच्या भिंतीवर फक्त चादरी सुकवायच्या? असा सवाल सोलापूरकांपुढे आहे. कारण एवढ्या मोठ्या विमानतळाला एक चिमणी (Solapur Airport Problem) अडचण ठरलीय. आता तुम्हाला वाटेल चिमणी कशी काय अडचण ठरू शकते? तर ही आकाशात उडणारी आणि झाडावर बसणारी चिमणी नाही, तर ही कारखान्याची चिमणी आहे. या चिमणीमुळे गेल्या कित्येक वर्षापासून सोलापूर विमानतळाहून वाहतूक बंदच आहे. आणि आता या प्रकरणात आणखी एक नवं ट्विस्ट आलं आहे. सोलापूर विमानतळाला अडथळा ठरणाऱ्या चिमणीबाबत धक्कादायक माहिती समोर चिमणी पाडकामाला खुद्द ज्येष्ठ नेते शरद (Sharad Pawar) पवारांनी ब्रेक लावला असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवारांनी केला पत्रव्यवहार

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना शरद पवारांनी पत्रव्यवहार करून ही चिमणी पाडण्याचे काम थांबबावे अशी विनंती केली आहे. सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यास विलंब करावा अशी मागणी पवारांकडून पत्राद्वारे केली गेली आहे. त्यामुळे सर्वच शॉक झाले आहेत. सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को- जनरेशन प्लँटच्या चिमणीमुळे सोलापूरची विमानसेवा रखडली आहे. या चिमणीला शरद पवारांनी पाठिंबा दिल्याचे पत्र माहिती अधिकारात समोर आले आहे. त्यामुळे सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरकरांना विमान प्रवासाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या विजय जाधव यांनी माहिती अधिकारात या चिमणी पाडण्याचे काम कुठपर्यंत आले? किंवा या प्रकरणात काय अपडेट आहे, याबाबत माहिती मागवली होती, त्यात पवारांनी या चिमणीच्या पडकामाला ब्रेक लावण्यासाठी पत्रव्यवहार करून पाडकाम थांबवल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय. केंद्र सरकारच्या नव्या उडाण योजनेत सोलापूर विमानतळाचा समावेश आहे. मात्र सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळे विमानसेवा रखडली आहे. त्यामुळे सोलापूर विमानतळाचा वापर सध्या प्रवासासाठी नाही, तर फक्त सोलापूरी चादरी सुखावण्यासाठी होत आहे.

सोलापूर प्रभागरचनेत कुणाला दणका? कुणाला दिलासा? पाहा नवी प्रभागरचना

सोलापूर दूध संघाच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना धक्का; माजी अध्यक्षासह 26 जणांचे उमेदवारी अर्ज बाद

नियतीही तोडू शकली नाही 65 वर्षांची संसारगाठ, पती निधनानंतर दीड तासात पत्नीचाही अखेरचा श्वास

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.