सांगोल्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत, महाविकास आघाडीत बिघाडीची दाट शक्यता

शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. सांगोला विधानसभा जागेच्या वाटपावरून हा वाद निर्माण झाला आहे. शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांनी आघाडीने सन्मानजनक वागणूक न दिल्यास पक्ष बाहेर पडेल, असा इशारा दिला आहे. समाजवादी पक्षाच्या निघून जाण्यानंतर हा आणखी एक मोठा धक्का महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

सांगोल्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत, महाविकास आघाडीत बिघाडीची दाट शक्यता
सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडीची दाट शक्यता
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 4:13 PM

महाविकास आघाडीतून सांगोल्याचे शेकाप नेते बाहेर पडण्याची शक्यता आहे. सांगोल्यातील शेकाप नेत्यांनी ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून शेकाप पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे नुकतंच समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीत सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत सांगोला विधानसभेची जागा शेकापच्या वाट्याला असताना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक साळुंखे यांना घेतल्याने शेकापने नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत वेगळा निर्णय घेतला जात असेल तर शेकाप आपला उमेदवार याठिकाणी देणार, अशी भूमिका शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडीत जर सन्माजनक वागणूक मिळत नसेल तर शेतकरी कामगार पक्ष तत्काळ महाविकास आघाडीतून बाहेर पडेल आणि आगामी निवडणुकीत शेकाप सांगोला विधानसभेत उमेदवार देईल आणि निवडणूक लढेल. हीच गणपत देशमुख यांना श्रद्धांजली असणार आहे, अशी भूमिका शेकाप नेते बाबासाहेब देशमुख यांनी मांडली आहे. बाबासाहेब देशमुख हेच शेकापचे सांगोल्याचे संभाव्य उमेदवार आहेत.

दिवंगत आमदार आबासाहेब देशमुख यांनी गेले 60 वर्ष सांगोला तालुक्याचे नेतृत्व केले. या तालुक्यात पुरोगामी विचार टिकवण्यासाठी गणपतराव देशमुख यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने सांगोल्याची जागा ही शेकापला सोडावी, अशी बाबासाहेब देशमुख यांची भूमिका आहे.

बाबासाहेब देशमुख यांचा मोठा इशारा

शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. महाविकास आघाडीकडून रायगड, कंधार, सांगोला या जागा सन्मानाने आम्हाला नाही मिळाल्या तर शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतःच्या ताकदीची चुणूक महाराष्ट्राला दाखवून देईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख यांनी दिला. आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने सांगोल्याची जागा दुसऱ्या पक्षाला दिल्यास शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार सांगोला विधानसभा मतदारसंघात उभा राहणार आणि विजयी होणार असल्याचे मत शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले आहे. यामुळे आता आघाडी बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.