“…कारण आपण खोटारडे आहात म्हणून तु्म्ही चर्चेला बसत नाही”; ठाकरे गटाच्या ‘या’ महिला नेत्यानी थेट फडणवीसांना दिले चर्चेसाठी आव्हान…

देवेंद्र फडणवीस यांचा कारभार म्हणजे आदालत भी मैं, मुजरिम भी मैं, कानून भी मैं, जज भी मैं असा तुमचा व्यवहा असला तरी आताची लोकं काय बगलेत व्हिडीओ मारून फिरत नाहीत ओ असा त्यांना त्यांनी जोरदार टोलाही लगावला आहे.

...कारण आपण खोटारडे आहात म्हणून तु्म्ही चर्चेला बसत नाही; ठाकरे गटाच्या 'या' महिला नेत्यानी थेट फडणवीसांना दिले चर्चेसाठी आव्हान...
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 7:41 PM

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर वेगवेगळ्या आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भागवत धर्मावर केलेली टीका, सीता, हनुमान या हिंदू समाजातील आदर्शावर केलेली टीका ठाकरे गटाला पचणारी आहे का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी एका पाठोपाठ प्रश्नांची खैरात केली आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस तुम्ही मला म्हणता सुषमा अंधारे हिंदू धर्माविरोधात आहेत.

मात्र या गोष्टीचीही पोलखोल कशी करायची असते ते मला चांगले माहिती आहे. संत आणि देवी-देवता यांच्या प्रश्नाविषयी मी बोलल्यावर तुम्ही टीका करता मात्र श्रीश्री रवीशंकर यांचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत. त्याबद्दल तुमचा काय भूमिका आहे.

माऊली आणि तुकोबा यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. त्याबद्दहील देवेंद्र फडणवीस तुमचे मत काय आहे. देवेंद्रजी यासाठी तुम्ही त्यांना अटक करणार का असा थेट सवाल त्यांनी गृहमंत्री त्यांना केला आहे.

तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर भाजपच्याच 15 मंत्र्यांना तुम्ही कसं काय क्लिनचीट देता आणि आणि त्या पंधरा मंत्र्यांमध्ये तुम्ही स्वतःला क्लीनचीट कशी काय दिली आहे. त्याचं स्पष्टीकरण तुम्ही देणार का असा सवालही त्यांनी उपमुख्यमंत्री यांना केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा कारभार म्हणजे आदालत भी मैं, मुजरिम भी मैं, कानून भी मैं, जज भी मैं असा तुमचा व्यवहा असला तरी आताची लोकं काय बगलेत व्हिडीओ मारून फिरत नाहीत ओ असा त्यांना त्यांनी जोरदार टोलाही लगावला आहे.

सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही देणार का असंही त्यांनी विचारलं आहे. कपटकारस्थान करत असताना, समोरचा माणूस दुबळा आहे असं तुम्ही अजिबात समजू नका.

पंधरा लोकांना क्लिनचीट तुम्ही कसं दिला त्याचं आधी उत्तर द्या अशी सडकून टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना एक न्याय आणि एकनाथ खडसे यांना दुसरा न्याय असा तुम्ही देताच कसा असा सवाल करून त्यांनी खडसे यांच्या प्रकरणावरूनही त्यांना घेरले आहे. तर मंत्री शंभूराजे देसाई यांनी शपथपत्रिकेत चुकीची माहिती दिली आहे.

त्याबद्दल तुमचे काय मत असंही त्यांनी स्पष्ट विचारले आहे. त्या बरोबरच मी तुमच्याबरोबर कधी ही कुठेही चर्चा करायला तयार आहे मात्र तुम्ही आदित्य ठाकरे यांच्याबरोबरही तुम्ही चर्चा करू शकला नाही कारण तुम्ही खोटारडे आहात असा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.