सोलापूरः सोलापुरातील जिल्हा नियोजन बैठकीत (Solapur District Planning Meeting) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांवर हफ्ते वसुलीचे आरोप केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावेळी सत्ताधारी आणि अधिकारी वाळू उपसा (Sand extraction) करणाऱ्यांकडून हफ्ते वसुली करतात, त्यामुळे जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा (Illegal sand extraction) मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपामुळे जिल्ह्यातील प्रशासनात आणि राजकारणात खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दोन नंबरची वाळू उपसा होत आहे, आणि या गोष्टीला प्रशासनातील अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांमधील काही जण यामध्ये सहभागी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. बेकायदेशीर वाळू उपसा आणि हफ्ता वसुलीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी आक्रमक होत यावरुन सवाल उपस्थित केले आहेत.
यावेळी झालेल्या नियोजन बैठकीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. अवैध वाळू उपसा का होता आणि तो का केला जातो तरीही त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही असा सवाल करुन अधिकाऱ्यांच्या कारवाईवर प्रश्नही चिन्हही उपस्थित करण्यात आला. अधिकारी, वाळू तस्कर यांचे लागेबांधे असून हफ्ता देत अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे आरोपही यावेळी करण्यात आला.
या बैठकीत भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते आणि राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी भर सभेत वाळू उपसावर आरोप करण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या गोष्टीचीच चर्चा आज दिवसभर होती.
सोलापूरातील नियोजन बैठकीत एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्यानंतर आमदार यशवंत माने यांनी वाळू उत्खननाला सुरुवात केल्यास भ्रष्टाचार बंद होऊन शासनाला महसूल मिळेल अशीही भूमिकाही त्यांनी मांडली.
नियोजन बैठकीच्या भरसभेत भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते आणि राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी आरोप केल्यानंतर हप्ते वसुलीत ज्यांचा समावेश आहे त्यांची नावं द्या, त्यांना तात्काळ निलंबित करू अशी भूमिका पालकमंत्री दत्ता भरणे यांनी यावेळी घेतली होती.