Solapur Garbage Depot Fire: कचरा डेपोला काल लागली आग, सोलापूर महानगरपालिकेला आज दिसले धुराचे लोट, त्यानंतर अग्निशमन दल आले

आगीच्या धुराचे लोट आकाशात आणि महामार्गावर दिसू लागल्यानंतर, त्याच धुरातून वाट काढत वाहन पुढे सरकू लागल्यानंतर महानगरपालिके अग्निशमनची वाहने मागवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Solapur Garbage Depot Fire: कचरा डेपोला काल लागली आग, सोलापूर महानगरपालिकेला आज दिसले धुराचे लोट, त्यानंतर अग्निशमन दल आले
सोलापुरातील कचरा डेपोला भीषण आग; अठरा तासापासून आग धुमसतीचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 4:56 PM

सोलापूर : सोलापुरातील महानगरपालिकेच्या (Municipal Corporation of Solapur) कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. या आगीचे लोट महामार्गावर आल्यानंतर मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली. काल संध्याकाळी 7 वाजता ही आग होती, त्याचे लोट दूरपर्यंत दिसू लागल्यानंतर मात्र आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागली असून अग्निशमन दलाच्या (Fire brigade) 50 पेक्षा जास्त गाड्यांमार्फत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र 18 तास उलटून जाऊनही अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

कचरा डेपो 53 एकरमध्ये

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे-हैद्राबाद महामार्गावर धुराचे लोट पसरलेले पहायला मिळत आहेत. सोलापूर महानगरपालिकेचा हा कचरा डेपो (Garbage Depot) 53 एकरमध्ये पसलेला आहे, त्यापैकी 44 एकरवर कचऱ्याचा ढीग असून त्याच कचऱ्याच्या ढिगाला सध्या आग लागली आहे.

अधिकारी फिरकलेच नाहीत

या कचरा डेपोला काल आग लागली, तरीही काल या लागलेल्या आगीकडे कोणताही अधिकारी फिरकला नाही. सोलापूर-धुळ राष्ट्रीय महामार्गावर हा कचरा डेपो असल्याने या मार्गावरुन वाहनांचीही प्रचंड वर्दळ असते. कचरा डेपोला आग लागल्यानंतर त्याची तीव्रता कमी होती, त्यामुळे प्रारंभी या आगीकडे कानाडोळा करण्यात आला मात्र हीच आग ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पसरली तेव्हा महामार्गावर आगीचे लोट, धुराचे लोट दूरवरुन दिसत होते. त्यानंतर मात्र सोलापूर महानगरपालिकेला जाग आली.

धुराचे लोट महामार्गावर

आगीच्या धुराचे लोट आकाशात आणि महामार्गावर दिसू लागल्यानंतर, त्याच धुरातून वाट काढत वाहन पुढे सरकू लागल्यानंतर महानगरपालिके अग्निशमनची वाहने मागवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

धुरातून वाहनांची वाट

सोलापूर-धुळे महामार्गावरील कचरा डेपोला आग लागल्यानंतर प्रारंभी आगीने रौद्ररुप धारण केले नव्हते. मात्र बारा तास उलटून गेल्यानंतर मात्र आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे आकाशात आणि महामार्गावर फक्त धुरच धूर दिसत होता. त्यामुळे या धुरातूनच वाहने वाट काढत पुढे सरकत होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.