अजितदादांच्या भेटीनंतर करमाळ्यात वातावरण तापले; साखर कारखान्याच्या निवडणुकीत आरोपांच्या फैरी, नारायण पाटलांनी डागली संजयमामांवर तोफ
Narayan Patil Attack on Sanjay Shinde : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात सध्या आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहे. ही निवडणूक राष्ट्रवादीतील दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. तर इतर आजी-माजी नेत्यांच्या भूमिकेमुळे चुरस वाढणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याने अनेक राजकीय धक्के दिले. मित्र शत्रू झाले तर शत्रू झाले. संजयमामा शिंदे यांचा पराभव हा तर मोठा चर्चेचा विषय ठरला. सध्या करमाळ्यात सध्या आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केल्याने ही निवडणूक राष्ट्रवादीतील दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. तर इतर आजी-माजी नेत्यांच्या भूमिकेमुळे चुरस वाढणार आहे.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना दोन वर्षांपासून आहे बंद आहे. त्यामुळे हा साखर कारखाना एकदा ताब्यात द्या, शेतकर्यांचा फायदा होईल असे आजी-माजी आमदार दावा करत आहेत. आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजयमामा शिंदे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत आहे.
तर आमदारकीचा फॉर्म भरणार नाही




आदिनाथ साखर सुरू करण्यासाठी तुमचं सहकार्य असेल आशिर्वाद असेल तर मी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला उर्जित अवस्थेत आणल्याशिवाय राहणार नाही आणि जर कारखाना उर्जित अवस्थेत आणू शकलो नाही पुढच्या वेळेस आमदारकीला फॉर्म भरणार नाही, असा दावा करमाळा विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी केला. कारखान्यावर आता काहीही नाही. मला म्हणतात तिथं जाऊन आता काय करणार आहे? मला जे काही करायचे आहे ते मी करून दाखविणार आहे, बोलून दाखविणार नाही एवढं लक्षात ठेवा, असा टोला त्यांनी विरोधी गटाला लगावला.
संजयमामांवर टीका
मागील आमदार संजय शिंदे यांच्या काळात कुठलं ठोस काम झालंय ते दाखवा, असा सवाल त्यांनी केला. माझ्या काळात पण ठोस काम झाली. ती त्यांच्या पाच वर्षाच्या काळात ठोस काम झाली ती दाखवा, असे जाहीर आवाहन नारायण पाटील यांनी दिले.
स्वत:चा कारखाना कसा उभा केला तर लोकांकडून शेअर्स गोळा केले. कारखाना उभा केला. काही शेतकर्यांचे पैसे दिले नाहीत. शेतकर्यांच्या वाहनांवरती कर्ज काढली आणि ते कॉम्प्रमाईझ करून घेतले. अनेक शेतकर्यांचे सिबील खराब झालं. त्यामुळे अनेक शेतकर्यांना बँकेत गेल्यावर कर्ज कुणीही कर्ज देत नाही अशी परिस्थिती असल्याची टीका त्यांनी शिंदे यांच्यावर केली.
हे आता घरी बसलेत नाहीतर यांनी एवढा ऊत मात केला असता सर्वसामान्य माणसाला वेठीस धरून गुडघ्यावर आणलं असतं आणि त्याचं दैवताला सुध्दा मान्य झालं नाही म्हणून घरी बसावं लागलं. भविष्यकाळात त्यांनी या तालुक्यात ( करमाळा ) निवडणुकीची तलप केली नाही पाहिजे म्हणून त्यांचा पराभव करण्याचे आवाहन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार नारायण पाटील यांनी बोलताना केले.
माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे आणि करमाळयाचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी जे केले, ते फेडायची वेळ त्यांच्यावर आली आहे. लक्षात ठेवा निवडणुकीसाठी या दोघांनी जवळपास 200 ते 300 कोटी रुपये काढून ठेवले होते परंतु दोन्ही ठिकाणी यांना अपयश आलं. कारण का लय पाप झाल्यावर कुठतरी पापाचा घडा पालथा होतो तसा यांचा घडा पालथा झालाय, अशी टीका त्यांनी केली.