अजितदादांना तिहार जेलमध्ये जायचं नव्हतं, त्यामुळे त्यांना भाजपसोबत जाणं भाग होतं- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar on Ajit Pawar : शरद पवार हे सिनियर, वयोवृद्ध पुढारी, पण आता त्यांच्याकडे काय राहिलंय? राष्ट्रवादीतील फुटीवर प्रकाश आंबेडकर यांचं भाष्य

अजितदादांना तिहार जेलमध्ये जायचं नव्हतं, त्यामुळे त्यांना भाजपसोबत जाणं भाग होतं- प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 3:09 PM

सोलापूर | 07 ऑगस्ट 2023 : तारीख 2 जून… याच दिवशी राष्ट्रवादीत राजकीय भूकंप झाला अन् एकाच पक्षाचे दोन भाग झाले. अजित पवार यांचं समर्थन करणारा गट भाजपसोबत गेला. तर शरद पवार यांना मानणाऱ्या वर्गाने त्यांच्याच सोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण अजित पवार यांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला. त्याबद्दल अनेक तर्क वितर्कही लढवले गेले. या सगळ्यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांना तिहार जेलमध्ये जायचे नसेल. तर त्यामुळे त्यांना भाजपसोबत जाणं भाग होतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

शालिनीताई पाटील यांच्या प्रश्नाचं खंडण अजितदादा यांनी केलं नाही.हे उदाहरणं बोलकं आहे. त्यामुळे अमित शहा यांना यश का येते यातून कळत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

शरद पवार हे सिनियर आहेत. वयोवृद्ध पुढारी आहेत. मात्र आता त्यांच्याकडे काय राहिलं आहे?, असा सवालही आंबेडकरांनी केला आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजी भिडेंवर कारवाई होणार नाही. कारण पंतप्रधान त्यांच्या पाया पडतात. त्यामुळे कोण पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत, असा घणाघात त्यांनी केला.

ज्यांना वाटतंय की महात्मा गांधी यांचा अपमान झाला. त्यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार यांच्या घराबाहेर जाऊन धरणे आंदोलन करावं. सरकारमध्ये तेच बसलेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करावं, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

आपल्या देशाचे नाव भारत असले तरी त्याला युनियन म्हणतात. त्यामुळे त्यातला युनियन महत्वाचं आहे. माळी धनगर एकत्र बसतात का? शिया -सुन्नी एकत्र बसतात का? त्यामुळे आपल्याला एकत्रपणे पुढे जायचे आहे, असं म्हणत विरोधकांच्या ‘INDIA’ आघाडीवर आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘INDIA’ आघाडी तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये जिंकू शकेल का? सत्तेवर बसलेला माणूस सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी मोदींच्या जागी असतो तर तेच केलं असतं. ज्याच्याकडे कुलूप असतो त्याची चावी त्याच्याकडेच असते, असंही ते म्हणालेत.

पंतप्रधान चेहरा दाखवा हा खेळ चालू आहे. ही पद्धत चुकीची आहे. जो कोणी पंतप्रधान होणार आहे त्याला अधिक खासदारांचा पाठींबा असणं गरजेचं आहे. मात्र लोकांना पंतप्रधान निवडण्याचा प्रकार चुकीचा आहे. ही पद्धत अराजकतेकडे जाणारी पद्धत आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.