3 महिन्यांपूर्वी मुलगी दगावली आणि आता मुलगा! कुणासाठी जगायचं? मायबापाचा उद्विग्न सवाल

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील काळीज पिळवटून टाकणारी घटना! त्या मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

3 महिन्यांपूर्वी मुलगी दगावली आणि आता मुलगा! कुणासाठी जगायचं? मायबापाचा उद्विग्न सवाल
धक्कादायक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 12:05 PM

सोलापूर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात एक दुर्दैवी घटना घडली. दिव्यांग निधीसाठी सुरु असलेल्या उपोषणादरम्यान एका दाम्पत्यानं आपल्या मुलीला तीन महिन्यांपूर्वी गमावलं होतं. दरम्यान, आता याच दाम्पत्याच्या मुलाचीही मृत्यू झालाय. या घटनेनं हळहळ व्यक्त होतेय. या मुलाच्या आणि त्याच्या बहिणीच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्नही आता विचारला जातोय. या मुलीच्या मृत्यूने आता प्रशासनही हादरुन गेलं आहे. दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिकका या मृत मुलाच्या आईवडिलांनी घेतलीय.

नेमकं काय प्रकरण?

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात चिखर्डे नावाचं गाव आहे. चिखर्डे गावात 3 महिन्यांपूर्वी एक उपोषण आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. दिव्यांग निधीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं.

3 महिन्यांपूर्वी दिव्यांग निधी मिळावा म्हणून चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आईवडिलांसोबत मुलगा आणि मुलगीबही उपोषणाला बसले होते. दरम्यान, 13 वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे या मुलीचा उपोषणादरम्यान, 3 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता.

दरम्यान, 4 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या दाम्पत्याचा रामचंद्र कुरुळे यांच्या मुलानेही प्राण सोडला. 10 वर्षांचा दिव्यांग मुलगा संभव रामचंद्र कुरुळे हा देखील उपोषणाला बसला होता. या मुलाचाही मृत्यू झाल्यानं त्याच्या आईवडिलांच्या मनावर मोठा आघात झाला आहे.

..म्हणून पुन्हा उपोषण!

कुरुळे कुटुंब दिव्यांग निधीसाठी ऑगस्ट महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. 3 महिन्यांआधी मुलगी गमावली आणि आता मुलाचाही जीव गेल्यानं कुरुळे पती-पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुलीच्या मृत्यूनंतर कुरुळे दाम्पत्याला प्रशासनाकडून आश्वासनं मिळाली होती. पण काहीच न झाल्यानं दुसऱ्यांदा हे दाम्पत्य उपोषणाला बसलं होतं. पण यावेळी दिव्यांग मुलाचा या उपोषणादरम्यान मृत्यू झाल्यानं त्यांना मोठा धक्का बसलाय.

वडिलांनी काय म्हटलं?

पहिल्यांदा जेव्हा मुलीचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला होता, तेव्हा निधी मिळवून देऊ, असं प्रशासनाकडून आम्हाला आश्वस्त करण्यात आलं होतं. पण आम्हाला काहीही मदत मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा उपोषणाला बसावं लागलं, असं मृत मुलाचे वडील रामचंद्र कुरुळे यांनी म्हटलंय.

आता माझ्या मुलाच्या मृत्यूमुळे आम्ही आणखीनच खचलो आहोत, पण आता जोपर्यंत मुरदाड प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोवर आपण मुलाचे अंत्यसंस्कार करणार नाही, असं मृत मुलाचे वडील रामचंद्र यांनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.