Maharashtra News : “शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय, अधिक बोललो तर…”

Raju Shetti on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर 'या' नेत्याने थेट निशाणा साधला आहे. या तिघांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय, असं या नेत्याने म्हटलं आहे. वाचा सविस्तर...

Maharashtra News : शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय, अधिक बोललो तर...
Image Credit source: Ajit Pawar FB
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 10:04 AM

सोलापूर | 04 ऑक्टोबर 2023, संदीप शिंदे : स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केली आहे. या गटार गंगेविषयी मी अधिक बोललो तर माझी जीभ विठळेल, असं राजू शेट्टी म्हणालेत. सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी मेळावा काल संध्याकाळी पार पडला. त्यानंतर राजू शेट्टी यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी सध्याच्या राजकारणावर त्यांनी भाष्य केलं. शिंदे सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरु आहे. याबाबत तुमचं मत काय असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सत्ताधारी गटातील एकही आमदार दारात उभा करण्याच्या लायकीचा नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. आम्ही कुणाच्या ही भानगडीत न पडत नाही. शेतकऱ्यांसाठी काम करतो. येत्या काळातही शेतकऱ्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करण्याचा आमचा मानस आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या निवडणुकीत बदल घडवेल. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करेन, असंही त्यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन वेळा भेटलो. पण काहीही उपयोग झाला नाही. कारखान्याच्या गोदामातील साखरदेखील बाहेर येऊन देणार नाही.कोल्हापुरात साखर अडवली जाऊ लागली आहे. आता आम्ही रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करणार आहोत. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत वापरु देणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.

ऊसाचा दुसरा हप्ता मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.  ऊसाची रिकव्हरी तपासणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये पवार लॉबी पाहायला मिळतेय. साखर कारखानदारच विश्वस्त आहेत. मग कसा कारभार होईल? सगळे साखर कारखानदार दरोडेखोरच आहेत. शेतकऱ्यांचा घामाचा पैसे खाऊन कारखानदारांकडे एवढा पैसा आला कुठून? मागचा हिशोब साखर कारखान्यांनी पूर्ण केल्याशिवाय ऊसाचं एक टिपरु देखील तोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.