Solapur : चिमुकल्या आरोही, बसवराजला साडीने गळफास देत आईची आत्महत्या! मायलेकी ठार, दीड वर्षांचं बाळ वाचलं
Solapur Suicide : प्रिती आणि विजय यांचा सुखाचा संसार चाललेला असताना दीड वर्षापासून त्यांच्या संसाराला दृष्ट लागली.
सोलापूर : सोलापूर (Solapur Crime News) जिल्ह्यात मायलेकांच्या आत्महत्येनं खळबळ उडालीय. 25 वर्षांच्या तरुण विवाहितेनं आपल्या दोन निष्पाप मुलासह गळफास घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. या मायलेकी ठार झाल्या. तर दीड वर्षांचा लेकरु थोडक्यात बचावलंय. ही धक्कादायक घटना मोहोळ (Solapur Suicide News) तालुक्यातील कोरवली इथं घडली. वयाच्या विसाव्या वर्षी या तरुणीचं लग्न झालं होतं. लग्नानंतर दोन अपत्यही या दाम्पत्याला झाली होती. पण गेल्या दीड वर्षांपासून या दाम्पत्याच्या संसारात वाद होऊ लागले. पती पत्नीत खटके उडू लागले. पत्नीला पतीकडून होणारा मानसिक छळ असह्य होऊ लागला होता. रोजची शिवागीळ, मारहाण सहन होत नव्हती. अखेर 25 वर्षीय तरुण विवाहितेनं आपल्या दोन्ही मुलांसह गळफास लावून घेत आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे तीन वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा यांना साडीने आधी गळफास देत आईने नंतर स्वतःही जीव दिला. ही घटना घडकीस आल्यानं संपूर्ण मोहोळ तालुका (Mohol District) हादरुन गेलाय.
लेकरांचा जीव घेत का केली आत्महत्या?
मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील तीन वर्षाच्या मुलीसह स्वतः गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली. यामध्ये प्रीती विजयकुमार माळगोंडे (वय 25 ) तर आरोही विजयकुमार माळगोंडे (वय 3) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. प्रीती यांचे पाच वर्षांपूर्वी कोरवली येथील विजयकुमार माळगोंडे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर प्रीती आणि विजयकुमार हे दाम्पत्य त्यांच्या शेतातील वस्तीवर राहत होते. त्यांना आरोही आणि बसवराज अशी दोन आपत्ये होती.
लेकीचा मृत्यू, लेक थोडक्यात वाचला
प्रिती आणि विजय यांचा सुखाचा संसार चाललेला असताना दीड वर्षापासून त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. पती विजयकुमार हा पत्नी प्रीतीला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन मारहाण तसेच शिवीगाळ करीत होता. निराश झालेल्या प्रितीने सततच्या त्रासाला कंटाळून मुलगी आरोही (वय 3 वर्ष) आणि मुलगा बसवराज (वय दीड वर्ष) यांना आधी संपवण्याचं ठरवलं.
दोन्ही निष्पाप लेकरांना राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास देऊन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मुलगा बसवराज याला गळफास व्यवस्थित न बसल्याने त्याचा जीव वाचला. मयताचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरूळे याने मृताचा पती विजयकुमार हा माझे बहिणीस सतत शिवीगाळ मारहाण दमदाटी करीत होता. त्यामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद रात्री उशिरा विजयकुमार माळगोंडे याच्या विरोधात दाखल केली.