गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली

अवकाळी पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजने लागू करावी यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कोण करणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 5:05 PM

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभा पिकांवर शेतकऱ्यांना नांगर फिरवावा लागला होता. तर आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर, माळशिरस तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसाना झाले आहे.

सध्या द्राक्षांचा हंगाम सुरू आहे, तर दुसरीकडे निर्यातीवर कर लावल्यामुळे द्राक्षांच्या दरावर मोठी परिणाम झाला आहे. त्यामुळे विक्रीसाठी असलेल्या द्राक्षांमुळेही शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असतानाच आता आणि निसर्गाने अवकाळी पावसाचा दणका दिल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब,सरगरवाडी या गावात गारासह जोरदार पाऊस झाला आहे.

त्यामुळे शेतातील पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे गहू, मका आणि ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड धांदल उडाली आहे. गहू, ज्वारी आणि द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार का असा सवाल आता शेतकरी करून लागले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब, सरगरवाडी भागाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

या भागात झालेल्या पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजने लागू करावी यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कोण करणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.