“उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि मंत्री गुवाहाटीला” ; या सरकारनं काय खेळ लावलाय; केंद्र आणि राज्यावर सडकून टीका…

राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कारभारावरही सडकून टीका केली. केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईचा फटका जनसामान्यांना कसा बसला आहे. ज्या सरकारने जीएसटी लावली आहे.

उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि मंत्री गुवाहाटीला ; या सरकारनं काय खेळ लावलाय; केंद्र आणि राज्यावर सडकून टीका...
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 12:23 AM

सोलापूरः हिवाळी अधिवेशन चालू असतानाच ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्राही राज्यातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जोरदार सुरू आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज महाप्रबोधन यात्रेत बोलताना केंद्र सरकारपासून राज्य सरकार पर्यंत आणि नरेंद्र मोदी यांच्यापासून ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांचा समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत विरोधकांवर जोरदार पणे त्या कडाडल्या आहे.

ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केली आहेत. त्या नेत्यांद्दल भाजपमधील एकही नेता त्यांचा राजीनामा मागत नाही म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज्यातील रोजगार, उद्योग आणि विकासाच्या राजकारणावर त्यांनी बोट ठेवले. राज्यात येणारे प्रत्येक प्रकल्प परराज्यात का जात आहेत असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्या म्हणाल्या की, उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि मंत्री गुवाहाटीला म्हणत या सरकारने काय खेळ लावला आहे बघा असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कारभारावरही सडकून टीका केली. केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईचा फटका जनसामान्यांना कसा बसला आहे. ज्या सरकारने जीएसटी लावली आहे.

ती अगदी दारूपासून ते माणसं मेली की जे कफन म्हणून कापड आणलं जातं त्यावरही यांनी जीएसटी लावला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक तरी पत्रकार परिषद घेतली आहे का असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे. नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत, कारण त्यांना त्याची भीती वाटते असा टोलाही त्यांना लगावला आहे.

बेरोजगारी आणि महागाईवर बोलताना सुषमा अंधारे यांनी बेरोजगारी आणि महागाईमध्ये भारत हा जगातल्या टॉप 12 मध्ये असल्याचे सांगत आपला बेरोजगारीचा दर हा 8 टक्के असल्याचाही त्यांनी सांगत केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.