…आता प्रत्येक गोष्टीला GST माणूस वैतागून थर्टी घ्यायला गेला तर त्यावर पण जीएसटी; म्हणून आम्हाला अच्छे दिन नकोच; महागाईवरून ‘केंद्रा’ला ठाकरे गटाने धू-धू धुतले
कॅग हा केंद्र सरकारचा आहे आणि त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे तो सांगतोय की उज्वला योजनेतील लोकांनी 50 टक्के लोकांनी परत गॅस घेतला नाही असं त्यामध्य नमूद करण्यात आले आहे.
सोलापूर: एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेतून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जोरदार हल्लाबोल सुरू आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूरातून सरकारवर टीका करताना त्यांनी केंद्राच्या धोरणावर जोरदार हल्ला केला. केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणावर सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. अच्छे दिन आणि बुरे दिनमधील फरक सांगत त्यांनी केंद्राचा कॅगचा अहवाल काय म्हणतो इथपासून ते अगदी सध्याच्या जीएसटी पर्यंतच्या धोरणापर्यंत त्यांनी सरकारचे ए टू झेड अहवालच आपल्या भाषणातून त्यांनी मांडला.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी महागाईचा सगळा आलेखच मांडला. यावेळी त्यांनी 90 रुपयांचे तेल 200 रुपये कसे झाले याचा आलेख मांडत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
डाळीच्या किंमती कशा वाढत गेल्या हे सांगताना त्यांनी सामान्य माणसांच्या परिस्थिती सांगितले त्या म्हणाल्या की, डाळीपेक्षा चिकन परवडायला लागले म्हणून लोक म्हणाले चिकन खाऊ का असा सवाल त्यांनी केला. महागाईवर बोलताना त्यांनी तेल, डाळ आणि गॅसची सध्याची परिस्थिती काय आहे याचं वास्तव चित्रही लोकांपुढे त्यांनी मांडले.
सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी कॅगचा अहवालही सांगितला. त्या अहवालामध्ये 35 टक्के लोकांनी सिलेंडर घेणे बंद केले असल्याचे म्हटले आहे.
तसेच कॅग हा केंद्र सरकारचा आहे आणि त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे तो सांगतोय की उज्वला योजनेतील लोकांनी 50 टक्के लोकांनी परत गॅस घेतला नाही असं त्यामध्य नमूद करण्यात आले आहे.
हे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्येक गोष्टीला जीएस्टी लावण्यात आली म्हणून वैतागून माणसं थर्टी घ्यायला गेली तर त्यावर पण जीएसटी आहे.
ती थर्टी घेऊन मेल्यावर कापड आणायला गेले तर त्या कापडावर पण जीएसटी लावली. त्यामुळे आम्हाला अच्छे दिन नको आम्हाला तेच बुरे दिन पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. हमको वहीच बुरे दिन चाहिए जिसमें हे 90 रुपये मे तेल मिलता है अशी सडकून टीकाही केंद्र सरकारवर करण्यात आली.