अभियंत्याने सुरू केली लाल केळींची शेती, पाहता-पाहता बदलले भविष्य, प्रेरणादायी कहाणी

या शेतकऱ्याचे नाव अभिजित पाटील आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील करमाला तालुक्यातील बशिम्बे गावचे रहिवासी आहेत.

अभियंत्याने सुरू केली लाल केळींची शेती, पाहता-पाहता बदलले भविष्य, प्रेरणादायी कहाणी
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 3:23 PM

सोलापूर : केळी खाण्याला कुणीही पसंती देतात. केळ हे फळ वर्षभर मिळते. याची शेती देशात सर्वत्र केली जाते. परंतु, आंध्र प्रदेश केळीचा सर्वात मोठा उत्पादक प्रदेश आहे. देशात उत्पादित होणाऱ्या १७.९ टक्के केळींचे उत्पादन आंध्र प्रदेशात होते. महाराष्ट्रातील शेतकरीही केळीचे उत्पादन घेत आहेत. शिकलेले लोकं शेतीतील मातीत जुळत आहेत. या युवा शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी जोडण्यासाठी आता आधुनिक शेती कारणीभूत ठरत आहे. आता आम्ही तुम्हाला अभियंता असलेल्या युवा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत जो केळीची शेती करून चांगले उत्पन्न मिळवत आहे.

या युवा शेतकऱ्याचे नाव अभिजित पाटील आहे. ते महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाला तालुक्यातील बशिम्बे गावचे रहिवासी आहेत. अभिजित पाटील यांनी सिव्हील इंजिनीअरिंग केलं. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यापेक्षा शेतीकडे लक्ष दिलं. त्यांनी उचललेलं हे पाऊल फायदेशीर राहिले. अभिजित पाटील लाल केळीची शेती करतात. लाखो रुपयांची कमाई करत आहेत. पारंपरिक पद्धतीने ते शेती करत होते. तेव्हा त्यांना फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती सुरू केली.

२०१५ ला केली केळीची लागवड

अभिजित पाटील सुमारे चार एकर जागेत लाल केळीची शेती करत आहेत. यातून त्यांना चांगला फायदा होत आहे. लाल केळीच्या शेतीतून त्यांना आतापर्यंत ३५ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. केळीचे उत्पादन तयार होण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. एका एकर जागेसाठी एक लाख रुपये खर्च येतो. अशाप्रकारे चार लाख रुपये खर्च करून केळीची शेती करतात. यातून त्यांना दरवर्षी लाखो रुपयांचा फायदा होतो. अभिजित हे २०१५ पासून केळीची शेती करत आहेत.

दरवर्षी ६० टन केळीचे उत्पादन

अभिजित पाटील यांच्या सांगण्यानुसार, लाल केळीमध्ये हिरव्या आणि पिवळ्या केळीच्या तुलनेत अधिक व्हिटॅमीन आणि पोषक तत्व असतात. यामुळे लाल केळीची मागणी जास्त वाढत आहे. लाल केळीला जास्त भाव मिळत आहे. लाल केळीचा भाव सध्या ६० रुपये डझन आहे. याचा भावही सामान्य केळीच्या तुलनेत जास्त असतो. सध्या अभिजित हे चार एकर शेतीत ६० लाख टनाचे उत्पादन करत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.