ज्येष्ठ साहित्यिक मदतीची याचना करताना आढळले; सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार
ज्येष्ठ साहित्यिक मदतीची याचना करताना आढळलेत. त्यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याची माहिती समोर येतेय. त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळविण्यात आले आहे.
सोलापूर : दिल्लीतील ज्येष्ठ साहित्यिक, संपादक असलेले एम. जी. भगत (M. G. Bhagat) हे अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदतीसाठी पंढरपूरमध्ये याचना करताना आढळले. ही दुर्दैवी घटना समोर आलीय. साहित्यिक एम. जी. तथा मधुकर भगत हे मूळचे वर्ध्याचे आहेत. ते दिल्लीत एनसीईआरटीत (NCERT in Delhi) क्लास वन पदावर कार्यरत होते. त्यांनी नॅशनल कॉन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲंड ट्रेनिंग या संस्थेत पुस्तक निर्मितीच्या पदावर कार्यरत होते. त्यांनी आजवर अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे. एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र पंढरपूरमध्ये देवदर्शनासाठी (Devdarshan in Pandharpur) आलेले भगत हे रस्त्याच्या कडेला मदतीची याचना करताना आढळून आले. ते इंग्रजीत संवाद साधत होते. मात्र त्यांचे म्हणणे कोणी ऐकून घेत नव्हते.
शासकीय रुग्णालयात उपचार
रॉबीनहूड आर्मीच्या एका सदस्याने एम. जी. भगत यांच्याशी संवाद साधला. त्यांना अन्न-पाणी दिले. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरला पाठवले. भगत त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर योग्य ते उपचार आणि काळजी घेतली जाणार आहे. असे सोलापूरच्या मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी स्पष्ट केले.
भगत यांना नेमकं काय झालंय
एम. जी. भगत यांना स्मृतीभ्रंश झाल्याचेही समोर आलेय. प्रशासनाकडून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क केला आहे. ते काही दिवसांत दिल्लीवरून त्यांना घेऊन जाणार असल्याची माहिती समोर येतेय. मात्र एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती पंढरपूरमध्ये मदतीची याचना करताना आढळलेत. त्यामुळं हळहळ व्यक्त केली जातेय. ज्येष्ठ साहित्यिक मदतीची याचना करताना आढळलेत. त्यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याची माहिती समोर येतेय. त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळविण्यात आले आहे.