आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनाची त्रिसुत्री; पंढरपूरात आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेवर भर देणार; जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी
आषाढी वारीसाठी 10 हजार शौचालयाची मागणी करण्यात आली आहे. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे.
सोलापूर: यंदाच्या आषाढी एकादशीसाठी (Ashadi Ekadashi) राज्यभरातून 15 लाख वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयार सुरू झाली आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाने वारीच्या नियोजनाबाबत त्रिसूत्री तयार सुरू केली आहे. यामध्ये आरोग्य (Health), स्वच्छता (cleanness) आणि सुरक्षा (Security) या त्रिसूत्रीवर भर देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
आषाढी वारीसाठी 10 हजार शौचालयाची मागणी करण्यात आली आहे. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे.
महिलांसाठी 40 टक्के शौचालय व्यवस्था
तर त्यापैकी 40 टक्के शौचालये महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
स्वतंत्र स्त्री आरोग्य अधिकारी
येणाऱ्या आषाढी वारीत महिलांसाठी विशेष सोय केली जाणार आहे. महिलांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्याठिकाणी स्त्री आरोग्य अधिकारी नियुक्त केली जाणार आहेत. वारकरी महिलांसाठी स्तनपान करण्यासाठी विशेष सोय केली असून वारी काळात वारकऱ्यांना 2 हजार ठिकाणी शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
महावितरण विभागाकडून योग्य दक्षता
आषाढी एकादशी काळात महावितरण विभागाकडून योग्य दक्षता घेतली जाणार आहेत. वारी काळात गर्दीत ॲम्बुलन्स जात नाही म्हणून बाईक ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली आहे. ती संख्या 35 असणार आहे. ते आरोग्य दूत म्हणूनही काम करणार आहेत. तसेच गावातील सेवा देण्यासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांची नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य मेळावा घेणार असल्याची माहिती दिलीप स्वामी यांनी दिली आहे.