Solapur Child Death : सोलापूरमध्ये पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, चिखलठाणमधील घटना
चिखलठाण येथील ऍड. दिगंबर साळुंके यांनी घरासमोर जनावरांना पाणी पिण्यासाठी दीड फूट उंचीची टाकी बांधली आहे. साळुंके यांचा दोन वर्षाचा चिमुकला पार्थ हा घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तो पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि काही कळायच्या आत तो त्या टाकीत पडला. टाकीत पडताना त्याचे डोके खाली आणि पाय वर अशा स्थितीत कोसळला.
सोलापूर : घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्या (Child)चा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पार्थ दिगंबर साळुंके असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. करमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून अद्याप पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली नाही. पार्थ घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तो या पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि तोल जाऊन टाकीत पडला. पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Two year old Child dies after falling into water tank in Solapur)
खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून बुडाला
चिखलठाण येथील ऍड. दिगंबर साळुंके यांनी घरासमोर जनावरांना पाणी पिण्यासाठी दीड फूट उंचीची टाकी बांधली आहे. साळुंके यांचा दोन वर्षाचा चिमुकला पार्थ हा घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तो पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि काही कळायच्या आत तो त्या टाकीत पडला. टाकीत पडताना त्याचे डोके खाली आणि पाय वर अशा स्थितीत कोसळला. बराच वेळ पार्थ कुठे दिसला नाही म्हणून घरच्यांनी त्याचा शोध घेतला. शोधाशोध करताना पार्थ पाण्याच्या टाकीत पडलेला आढळला. घरच्यांनी लगेच त्याला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. पाण्यात पडल्याने गुदमरुन पार्थचा मृत्यू झाला होता. चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माढा तालुक्यात शिक्षकाचा नदीत बुडून मृत्यू
माढा तालुक्यातील सीना नदीत पोहायला गेलेल्या एका सरकारी डॉक्टरचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोलापुरात घडली आहे. सीना नदीच्या पात्रातील बंधाऱ्यात पोहत असताना थकल्याने सोलापूरच्या सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे. डॉ.रेहान आरिफ सय्यद (26) असं बुडून मृत्यू झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. डॉ. रेहान हे मुळचे इंदापूरचे रहिवासी आहेत. कुर्डूवाडी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. डॉ.रेहान हे सुट्टीनिमित्त कुटुबियांसमवेत त्यांचे वडिलांचे मित्र संजय सरोदे (रा.म्हैसगाव ता.माढा) यांच्या शेतात आले होते. याच गावातील सीना नदीपात्रात रेहान,अमन व जिब्रान सय्यद हे तिघे भाऊ पोहण्यासाठी गेले होते. पोहत पोहत रेहान हे बंधाऱ्याच्या दाराजवळ पोहचले. बंधाऱ्याच्या दाराच्या दिशेने पाण्याच्या प्रवाहाचा वेग असल्याने त्यांना नदीकाठी येता आले नाही. थकल्याने ते पाण्यात बुडाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. (Two year old Child dies after falling into water tank in Solapur)