Solapur : सोलापुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे गनिमी काव्याने आंदोलन ; महाआरती करत केली ‘ही’ मागणी

इंदापूरमधील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी शासनाने 348 कोटी निधी मंजूर केल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत. राज्यमंत्री व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सदसद विवे बुद्धी द्यावी यासाठी यावेळी ग्रामदेवतेची आरतीही आकरण्यात आली

Solapur : सोलापुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे गनिमी काव्याने आंदोलन ; महाआरती करत केली 'ही' मागणी
Solapur Andolan Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 1:33 PM

सोलापूर – उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आज सोलापुरात (Solapur)  गनिमी काव्याने आंदोलन सुरु केले आहे. उजनी धरणातून इंदापूरला पाणी देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते आणि संघटनांचा तीव्र विरोध आहे. इंदापूरमधील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी (lakadi-Nimbodi Upsa Irrigation Scheme) शासनाने 348 कोटी निधी मंजूर केल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत. राज्यमंत्री व पालकमंत्री दत्तात्रय भरणे (  Minister of State Dattatraya Bharane ) यांना सद्सद विवेक बुद्धी  द्यावी.   यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीतेर्फे सिद्धेश्वर मंदिरात   महाआरती करण्यात आली. यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या आंदोलकांना पोलिसानी ताब्यात घेतले. फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले. यापूर्वीही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्याकडवून घोषणाबाजी करण्यात आली होती.

शेतकऱ्यांच्याकडून  घोषणाबाजी

उजनी धरणातून इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याची योजना असून त्याला सोलापूरकरांचा तीव्र विरोध आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसासिंचन योजनेला पाणी देण्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. धरण होताना इंदापूर तालुक्‍यातील 28 गावे धरणात गेली तर पाच गावे बाधित झाली. धरणासाठी करमाळा तालुक्‍यातील अनेक गावांनाही स्थलांतरित व्हावे लागले. त्यापैकी बहुतांश गावांमधील शेतीला पुरेसे तथा पाणीच मिळत नसल्याची स्थिती आहे

काय आहे योजना

उजनीतील पाण्यामुळे सोलापूर जिल्हा रब्बीच्या हंगामात वाढ झाली आहे. तसेच साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली. मात्र तरीही अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, सांगोला या तालुक्‍यातील बऱ्याच शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळू शकलेले नाही. अशी वस्तुस्थिती असतानाही उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 117 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणाचे काम 1969 रोजी सुरू झाले. जून 1980 मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.