SOLAPUR मध्ये अनोखी धुळवड, एकमेकांवर दगडफेकीची परंपरा, पावसासाठी वर्षानुवर्षांची प्रथा
साधारणपणे राज्यात धुळवड ही विविध पद्धतीने साजरी केली जाते. मात्र सोलापुर (solapur) जिल्ह्यातील मोहोळ (mohol) तालुक्यातील भोयरे (bhoyare) गावात चक्क रक्तांची धुळवड खेळली जाते.

सोलापूर – साधारणपणे राज्यात धुळवड ही विविध पद्धतीने साजरी केली जाते. मात्र सोलापुर (solapur) जिल्ह्यातील मोहोळ (mohol) तालुक्यातील भोयरे (bhoyare) गावात चक्क रक्तांची धुळवड खेळली जाते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना ? पण हे खरं आहे. मोहोळ मधील भोयरे गावात दोन गटामध्ये एकमेकांवर दगडफेक करत धुळवड खेळण्याची जुनी परंपरा आहे. गावातील एक गट भवानी देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो. शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळीवडीला दिवसभर येथील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. यामध्ये अनेक तरुण जखमी देखील होतात. मात्र हे जखमी लोक दवाखान्यात किंवा डॉक्टरकडे न जाता देवीच्या अंगाऱ्यावर नीट होतात. जेवढे जास्त लोक जखमी होतील त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात.
SOLAPUR मध्ये अनोखी धुळवड, एकमेकांवर दगडफेकीची परंपरा, पावसासाठी वर्षानुवर्षांची प्रथा#solapur #mohol #bhoyare #Holi2022 pic.twitter.com/hU5cogIS0m
— TV9 Marathi Live (@tv9_live) March 19, 2022
जेवढे जास्त लोक जखमी होतील त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा
दोन वर्षात कोरोनाच्या संसर्गामुळे गावकऱ्यांना जुन्या पद्धतीने धुळवड खेळता आली नव्हती. पण यंदा संसर्ग कमी असल्याने जुन्या पध्दतीने धुळवड साजरी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. पोलिसांनी यंदाही अशा पद्धतीने धुळवड साजरी करू नये अशी विनंती गावकऱ्यांना केली होती. परंतु गावकऱ्यांनी पोलिसांचं म्हणणं मनावर घेतलं नाही. भोयरे गावातील ग्रामस्थांनी होळी झाल्यानंतर सकाळी जिथं धुळवड साजरी केली जाते. तिथं दगड जमा केले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांनी धुळवडीला सुरूवात केली. त्यावेळी दोन गटांनी एकमेकांवर जोरदार दगड फेक केले असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. तसेच धुळवड खेळताना दगड लागल्यानंतर कोणीही रूग्णालयात जात नाही, तर देवळात बसतात. जेवढे लोक जखमी होतील, तेवढा पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. ग्रामस्थांनी आपली अनेक वर्षांची परंपरा यंदाच्या वर्षी देखील जपली.
नेमकं व्हिडीओ काय आहे
एक गट देवळाच्या शिखराशेजारी आहे. तर एक गट देवळाच्या पायथ्याशी आहे. दोन गटांमध्ये सायंकाळच्या सुमारास धुळवड खेळताना दगडफेक सुरू झाली. त्यावेळी अनेक तरूण देवळाच्या वरच्या बाजून खाली दगड फेकत होते. तर काही तरूण खालच्या बाजूने त्यांच्याअंगावर दगड फेकत आहेत.