सोलापूर : वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर त्याचा फटका भाजपच्या कार्यकर्त्याला बसला आहे. नगरंपचायतीच्या निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्ते इस्माईल पटेल यांच्या द्राक्ष (Grapes) बागेचे 15 ते 20 लाखाचे नुकसान राजकीय (Politics) सूडबुद्धीने केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. द्राक्ष बागेतील मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याने वैराग (Vairag) पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. छाटणी करायला आलेल्या द्राक्षे तोडून टाकण्यात आल्यामुळे मातीमोल झाली आहेत.
इस्माईल पटेल यांच्या द्राक्षेच्या बागेतील द्राक्षे आता तोडणीला आले होते. मात्र वैराग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर पटेल यांच्या द्राक्ष बागेतील 80 टक्के घड तोडून 80 तोडून नुकसान केल्याच त्यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे आधीच राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. कोरोनाचे संकट सुरू असतानाच नैसर्गिक संकटानाही तोंड देत महाराष्ट्रातील शेतकरी या सगळ्या संकटांशी लढत आहेत. त्यात या अशा राजकीय सूडबुद्धीने शेतकऱ्यांचे जर नुकसान केल जात असेल तर शेतकऱ्यांच्या समस्या वाढणाऱ्याच आहेत.
सध्या सांगलीसह सोलापूरातील काही भागातील द्राक्ष बागांमध्य द्राक्ष छाटणीची कामे सुरू आहेत. कारण सध्या द्राक्षांचा हंगाम असल्याने बागेतून तयार झालेल पीक बाजारात दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पटेल यांच्या द्राक्षे बागेतीलही द्राक्षे आता छाटणीसाठी तयार झाली होती मात्र राजकीय सूडबुद्धीतून त्यांच्या द्राक्ष बागेचे अज्ञातानी प्रचंड मोठे नुकसान केले आहे. पटेल यांच्या बागेतली 80 ते 90 टक्के द्राक्षेचे घड तोडण्यात आले आहेत. अज्ञातानी केलेल्या या बागेच्या नुकसानीमुळे यावर्षीचा त्यांचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक तोटाही सहन करावा लागला आहे. द्राक्ष बागेचे नुकसान करणाऱ्या अज्ञाताना पोलिसांनी ताब्यात घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या