Prakash Ambedkar | ‘माळी, धनगर एकत्र बसतात का?’ प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
Prakash Ambedkar | "जर मी औरंगजेबाच्या मजारीवर गेलो नसतो, तर दंगली झाल्या असत्या" असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 'फक्त मार्केटिंगच्या पलीकडे काहीच दिसतं नाही' अशी टीका सुद्धा त्यांनी केली.
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “10 वर्षांपासून भाजप आणि आरएसएसचे राज्य पाहतोय. या कालावधीत मॉब लिंचींग आणि ट्राईब नष्ट केले जात आहेत. फक्त मार्केटिंगच्या पलीकडे काहीच दिसतं नाही. शांततेच राज्य अशांततेत घालवण्याचे कामं केले आहे” असं प्रकाश आंबडेकर म्हणाले.
“देशात पुन्हा दंगली होतील. हिंदू-मुस्लिम डिवाईड झाले, तर सरकार पुन्हा येईल असं वाटतय. गावागावात हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा शोधण्याचे काम सुरू आहे. त्याद्वारे लव्ह-जिहादचे नाव देण्याचे काम सुरू आहे” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
‘एक ट्राईब दुसऱ्या ट्राईबशी लढवण्याचा काम’
“कर्नाटकमधील निकाल पचवता आला नाही. राज्यराज्यातील परिस्थिती वेगळी आहे. ती पाचवण्याची ताकद नाही म्हणून दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. एक ट्राईब दुसऱ्या ट्राईबशी लढवण्याचा काम दिसत आहे. शासनाचा सूड हा दंगलीचा सूड दिसतोय” असं प्रकाश आंबडेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस विसरले की….
“मी आवाहन करतो की शांतता बाळगावी. काही समूहाने दहा वर्षे भीतीत घालवली. आता 6 महिने वाट पहा. सरकार कोणाचे येईल हे सांगू शकत नाही, पण मोदी पंतप्रधान होणार नाहीत. देवेंद्र फडणवीस विसरले की निवडून आलेला माणूस नोकर असतो, मतदार हा मालक असतो” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
….तर दंगली झाल्या असत्या
“राहुल गांधी यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की, मला 4 महिने खासदारकी नको आहे. मी केरळातून पुन्हा निवडून येईन. मणिपूर, राजस्थान, छत्तीसगड येथे दंगली झाल्या. जर मी औरंगजेबाच्या मजारीवर गेलो नसतो, तर दंगली झाल्या असत्या” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अजितदादांना तिहारमध्ये जायचं नव्हतं, म्हणून….
“शरद पवार हे सिनियर, वयोवृद्ध पुढारी आहेत. मात्र, आता काय राहिले त्यांच्याकडे?. अजितदादांना तिहारमध्ये जायचे नसेल, तर त्यांना जाणे भाग आहे. शालिनीताईंच्या प्रश्नाचे खंडन अजितदादा यांनी केले नाही. हे उदाहरणं बोलकं आहे. त्यामुळे अमित शहा यांना यश का येते यातून कळते” असं प्रकाश आंबडेकर म्हणाले.
संभाजी भिडेवर कारवाई होणार नाही, कारण…..
“संभाजी भिडेवर कारवाई होणार नाही. कारण पंतप्रधान त्यांच्या पाया पडतात. त्यामुळे कोण पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार? पंतप्रधानपदाचा चेहरा दाखवा हा खेळ चालू आहे. ही पद्धत चुकीची आहे, जो कोणी पंतप्रधान होणार आहे त्याला अधिक खासदारांचा पाठींबा असणे गरजेचे आहे. मात्र लोकांना पंतप्रधान निवडण्याचा प्रकार चुकीचा आहे. ही पद्धत अराजकतेकडे जाणारी पद्धत आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ‘माळी, धनगर एकत्र बसतात का?’
“INDIA तेलंगणा, आंध्रत जिंकू शकतील का?. सत्तेवर बसलेला माणूस सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार. मी मोदींच्या जागी असतो तर तेच केले असते. ज्याच्याकडे कुलूप असते, त्याची चावी त्याच्याकडेच असते. आपल्या देशाचे नाव भारत असले तरी त्याला युनियन म्हणतात. त्यामुळे त्यातला युनियन महत्वाचे आहे. माळी, धनगर एकत्र बसतात का? शिया -सुन्नी एकत्र बसतात का? त्यामुळे आपल्याला एकत्रपणे पुढे जायचे आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.