Vinayak Raut : बाळासाहेब अन् दिघेंचा फोटो कोपऱ्यात टाकत गद्दारानं मोदी, शाह यांचे फोटो लावले; विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही. बाळासाहेब हे बाळासाहेबच आहेत. त्यांना हिंदूहृदयसम्राट ही पदवी सरकारने दिलेली नाही, जनतेने दिली, असे विनायक राऊत म्हणाले.

Vinayak Raut : बाळासाहेब अन् दिघेंचा फोटो कोपऱ्यात टाकत गद्दारानं मोदी, शाह यांचे फोटो लावले; विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
एका कार्यक्रमादरम्यान विनायक राऊतImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 11:34 AM

सोलापूर : पंतप्रधानांचा आदर कसा करावा याचे पूर्णपणे भान शिवसैनिकांना आहे. परंतु शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करणारे बाळासाहेबांचा फोटो आजही वापरत आहेत. सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपा तसेच शिंदे गटावर केली आहे. वर्षानुवर्षे आनंद दिघे यांच्या संस्कारात वाढणाऱ्या गद्दाराने ठाण्यामध्ये काल बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा फोटोही कोपऱ्यात टाकला होता. मात्र या दोघांच्या कित्येक पटीने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो लावले होते, असा घणाघात विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केला. देवेंद्र फडणवीस यांनी काल कबूल केले, की देशातील मोदी पर्व आता संपत आले आहे. त्यामुळे मोदींच्या नावे मते मागण्याचे दिवस गेले आणि बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे फडणवीसांनी काल कबूल केले, असा टोला त्यांनी लगावला.

‘भाजपा मोदींची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न करत होता’

नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही. बाळासाहेब हे बाळासाहेबच आहेत. त्यांना हिंदूहृदयसम्राट ही पदवी सरकारने दिलेली नाही, जनतेने दिली. मला आजही आठवते, की ज्यावेळी संपूर्ण भाजपा मोदींची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न करत होता, अरबी समुद्रात विसर्जन करायला निघाले, त्यावेळी देशात एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर मोदी जेव्हा मुंबईत आले तेव्हा बाळासाहेबांना त्यांनी वाकून नमस्कार केला, हा किस्सा त्यांनी सांगितला.

‘चित्रा वाघांना आंधळेपण स्वीकारावे लागेल’

ज्या पद्धतीने संजय राठोडांवर चित्रा वाघ तुटून पडल्या होत्या. आता कोणत्या शब्दात संजय राठोड यांना क्लिनचीट देता. एकदा त्यांनी सांगितले तर बरे होईल. चित्रा वाघांना आंधळेपण स्वीकारावे लागेल, असे वाटत आहे. सत्तेत आल्यानंतर संजय राठोड धुतल्या तांदळासारखे झाले. मात्र काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करा, फौजदारी दाखल करा, अशी मागणी करणाऱ्या चित्राताई एका बाजूला आणि संजय राठोड यांची भलामन करणाऱ्या चित्रा वाघ एका बाजूला. हा फरक लोकांसमोर दिसत आहे, अशी टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

‘तुमच्या चमकेश मुख्यमंत्र्यांकडे तसे धाडस कधी येणार?’

भरत शेठ गोगावलेला स्वातंत्र्यवीर सावरकर कोण आहेत, हे तरी माहिती आहे का? काल, परवापर्यंत हातभट्टी, मटका चालवणाऱ्या गद्दारांना 50 खोके एकदम ओके झाल्यानंतर सावरकरांबाबत उद्धव ठाकरेंना विचारणे म्हणजे विनोदच आहे. शिवसेनेने सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी प्रथम लोकसभेत केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला उद्धवजी गेले होते. संभाजीनगर, धाराशिव हे नामांतर करण्याचा धाडस केवळ उद्धव ठाकरेंनी दाखवले. तुमच्या चमकेश मुख्यमंत्र्यांकडे तसे धाडस कधी येणार नाही, असा घणाघात त्यांनी भरत गोगावले यांच्यावर केला.

‘गुलाबराव पाटलांची दांडी गुल केली’

गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंकडे आमदारांना नेण्याची गरजच नव्हती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी विभागवार आमदारांची बैठक घ्यायला सुरुवात केली होती. सर्व आमदारांना चहापाण्याला बोलावले होते. बडबड करायची, तोंडाची वाफ घालवायची यात गुलाबरावांचे समाधान असेल. मात्र आदित्य साहेबांनी जळगावचा दौरा करून गुलाबराव पाटलांची दांडी गुल केली. जळगावात शिवसेनेचा आमदार आम्ही आता निवडून आणणार, असा निश्चय विनायक राऊत यांनी केला.

‘रिफायनरीचे दलाल आता सत्तेत’

कोणत्याही परिस्थितीत कोकणातल्या लोकांच्या घरावर नांगर फिरवून आम्ही रिफायनरी होऊन देणार नाही. काल उद्धव ठाकरे यांच्याशी माझी त्या संदर्भात चर्चा झालेली आहे. दुर्दैवाने रिफायनरीचे दलाल आता सत्तेत आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता. धर्मेंद्र प्रधान आणि आणखी एका व्यक्तींनी मला त्या संदर्भात समजावण्याचा प्रयत्न केला होता. ते नाव मी वेळ आल्यावर सांगेन. रिफायनरीचे दलाल सत्तेत आल्यामुळे लोकांमध्ये दहशत आहे. त्यामुळे अधिकची कुमक मागून रिफायनरीचा सर्वे केला जात आहे. मला उद्धव ठाकरे जेव्हा आदेश देतील, त्यावेळी तेवढ्याच ताकतीने सत्याच्या बाजूने मैदानात उतरेल, असे विनायक राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.