विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला 73 कोटींची तरतूद केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांचे आभार; मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांची घेतली भेट
विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीसुध्दा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
मुंबईः पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या (Vithhal rukmini Mandir) विकास अराखड्यासाठी अर्थसंकल्पात 73 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन अभिनंदन तसेच आभार मानले. विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीसुध्दा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 725 व्या समाधी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील सासवड येथील संत सोपानकाका महाराजांचे समाधीस्थळ, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली. त्याबद्दलही देवस्थान समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करुन आभार मानले.
अर्थसंकल्पात यासाठी तरतूद
अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधीतून विठ्ठल मंदिर व सभामंडप, रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी व नागरखाना, पडसाळ लहान मंदिर, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क (आतील व बाहेरील) दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडीट, वॉटर सप्लाय व ड्रेनेज, इलेक्ट्रीकल वर्क, साऊंड सिस्टीम, फायर सिस्टीम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, रोकडोबा मंदिर, सोमेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर सभामंडप सागवाणी काम, इतर परिवार देवता मंदिरे, कमान बांधकाम व इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहे.
यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, विठ्ठल मंदिर रुक्मिणी समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुलवड, शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे उपस्थित होते.
संबंधित बातम्या
हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्या, अजानच्या आवाजाबाबत मुंबईकर नाराज-भाजप
राज्य बाजार समितीवर महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व, भाजपला धोबीपछाड