महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांचं म्हणणं काय, टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

लाख लाख दीड-दीड लाख बील येत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांचं म्हणणं काय, टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 8:04 PM

सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर भीमा नदी आहे. कर्नाटकच्या सीमेवरील गावांना मोफत वीज पुरविली जाते. पाणीपट्टी घेतली जात नाही. महाराष्ट्राच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यातील कुडल हे गाव आहे. कुडलचे सरपंच म्हणाले, महाराष्ट्र मोठं राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहेत. पण, कर्नाटक राज्यानं बेळगावात सुखसोयी केल्या. त्यामुळं त्यांचा महाराष्ट्रात येण्याचा कल नाही. अक्कलकोट तालुक्यातील सीमेवरील लोकांना चांगले रस्ते नाहीत. एसटीची वाहतूक नाही. पोरांना शिक्षणासाठी सोयीस्कर वातावरण नाही. चांगल्या शिक्षणासाठी वीस किलोमीटर जावं लागतं. कच्चा रस्ता आहे. गरीब लोकं शाळेपर्यंत जाऊ शकत नाहीत.

१९७२ साली सोलापूर आणि अक्कलकोटच्या दोन गाड्या होत्या. पण, आता त्या गाड्या बंद पडल्यात, असा आरोप कुडल येथील सरपंचांनी केला. रस्ते खराब असल्यानं या बस बंद करण्यात आल्यात. पोरांना जाण्यासाठी खाली वाहनानं जावं लागते. पण, रस्ते खराब आहेत. त्यामुळं येथील मुलं शिक्षणापासून वंचित आहेत.

ज्येष्ठ नागरिक म्हणाले, १९८२ पासून आतापर्यंत आम्ही सीमेवर आहोत. पण, कर्नाटकमध्ये जाण्याचा आमचा विचार आहे. कारण महाराष्ट्र सरकारनं आम्हाला वंचित ठेवलंय. रस्ते नाहीत. वीज नाही. पाण्याचा प्रश्न आहे.

कर्नाटक सरकारनं पाच किलोमीटर पाईपलाईन फुकट करून दिली आहे. सर्व सुखसोयी करून दिल्यात, तर आम्ही महाराष्ट्रात राहू. तुमच्या सावलीत जगू. पण, आवश्यक सुखसोयी करून दिल्या नाही तर आम्ही कर्नाटकात जाऊ, असा इशाराचं ज्येष्ठ नागरिकांनी दिला.

दोन्ही राज्यातील फरकच ज्य़ेष्ठ नागरिकांनी स्पष्ट करून सांगितला. कर्नाटकात २४ तास वीज मिळते. आम्हाला आठ तास वीज मिळते. तरीही बील मात्र मोठ्या प्रमाणात वसूल केले जाते. लाख लाख दीड-दीड लाख बील येत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.