आधुनिक मुघलांचे हस्तक कोण?, काँग्रेस प्रवक्त्याने केली अशी जहरी टीका
आपले मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात नवस फेडायला जातात. म्हणजे राज्यात नक्की चाललंय काय? मुख्यमंत्र्यांना जनाची काय लाज लज्जा वाटत नाही का, असा सवाल त्यांनी विचारला.
सोलापूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. काँग्रेस प्रवक्त्यानं योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधुनिक मुघलांचे हस्तक म्हणून काम करत आहेत का?, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला. बाहेरील राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्याचा विकास करायचा आहे.
काकासाहेब कुलकर्णी म्हणाले, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांना विनंती करून महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला नेले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले आणि पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले.
आपण इतिहासात वाचले की, मोगल राज्यात यायचे आणि राज्य लुटून जायचे. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या काळात आधुनिक मोगल म्हणून जन्माला आले आहेत की काय? इतर राज्यातील भाजप नेते महाराष्ट्रात येतात. येथील उद्योग पळवून नेतात. याचा अर्थ येथील मुख्यमंत्री आधुनिक मुघलांचे हस्तक म्हणून काम करत असल्याचा आरोपही काँग्रेस प्रव
राज्यातील व्यवसाय, उद्योग, बॉलिवूड तसेच इथली गुंतवणूक तिकडे घेऊन जातात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधुनिक मुघलांचे हस्तक म्हणून काम करत आहेत का? आपले मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात नवस फेडायला जातात म्हणजे राज्यात नक्की चाललंय काय? मुख्यमंत्र्यांना जनाची काय लाज लज्जा वाटत नाही का, असा सवाल त्यांनी विचारला.
राज्यात कोणीही यावं टिकली मारून जावे. या पद्धतीने इतर राज्याचा मुख्यमंत्री राज्यातील गुंतवणूक घेऊन जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री झाले आहेत. स्वतःचा स्वार्थ बघता बघता राज्याच्या आर्थिक गाड्याला नुकसान न पोहोचवून देण्याचे काम ही तुमची जबाबदारी आहे, याची आठवण काकासाहेब कुळकर्णी यांनी करून दिली.