श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न

भाजपचे माजी जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेने सांगोल्यातील जवळा येथे स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 12:05 AM

सोलापूर : भाजपचे माजी जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेने सांगोल्यातील जवळा गावात जावून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत लग्न करुन सोडून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच आपल्याविरोधात गुन्हा दाखल करुन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेने केला होता. या महिलेचं नाव निर्मला यादव असं आहे. निर्मला यादव यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करण्याआधी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपल्या टोकाच्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांना तसं न करण्याचं आवाहन केलं होतं. तरीही त्यांनी आज हा टोकाचा निर्णय घेतला आहे.

निर्मला यादव आणि श्रीकांत देशमुख यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहेत. श्रीकांत देशमुख यांनी आपली फसवणूक केली. त्यांनी खोटं बोलून आपल्याशी लग्न केलं. त्यांच्यासह त्यांच्या भावंडांनी आपली फसवणूक केली, असा आरोप या महिलेचा होता. या महिलेने पोलीस ठाण्यातही श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात तक्रार केली होती. याशिवाय महिलेने सोशल मीडियावर श्रीकांत देशमुख यांच्यासोबतचा एक लाईव्ह व्हिडीओ शेअर करत गंभीर आरोप करत होते. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर देशमुख यांना जिल्हाप्रमुख पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत होतं. निर्मला यादव हे फेसबुकच्या माध्यमातून आपली भूमिका मांडायच्या. ते श्रीकांत देशमुख आणि भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप करायच्या. संबंधित प्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली होती. या दरम्यान यादव प्रचंड मानसिक तणावातून जात असल्याचं त्यांच्या फेसबुक पोस्टमधून दिसत होतं. यादव यांनी गुरुवारी (18 मे) सकाळी एक व्हिडीओ शेअर करत आपण स्वत:ला संपवत असल्याचं म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

‘या’ नेत्यांमुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप

निर्मला यादव यांनी गुरुवारी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांना अनेकांनी असा टोकाचा निर्णय न घेण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही यादव यांनी ऐकलं नाही. निर्मला यांनी या व्हिडीओत आपल्या या टोकाच्या निर्णयाला श्रीकांत देशमुख, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि श्रीकांत देशमुख यांच्या भावाला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.

निर्मला यादव यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. अनेकांनी त्यांना परिस्थितीशी संघर्ष करण्याचं आवाहन केलं होतं. पण यादव यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.