Somaiya on Thackeray : हल्ल्याची स्क्रिप्ट मातोश्रीवर लिहिली गेली, सोमय्यांचा गंभीर आरोप; उद्या राज्यपालांना भेटण्याचा इशारा
आपल्यावर झालेल्या हल्ल्याची स्क्रिप्ट मातोश्रीवर लिहिली गेली आहे, असा गंभीर आरोप मंगळवारी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला. ते खार पोलीस (Police) ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी निघाले असता माध्यमांशी बोलत होते.
मुंबईः आपल्यावर झालेल्या हल्ल्याची स्क्रिप्ट मातोश्रीवर लिहिली गेली आहे, असा गंभीर आरोप मंगळवारी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला. ते खार पोलीस (Police) ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी निघाले असता माध्यमांशी बोलत होते. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकात गेले होते. त्यावेळी तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला किरीट सोमय्या यांना जावं लागलं. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत किरीट सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या यांनाही जखमा झाल्या. त्याच्या हनुवटीतून रक्त वाहत होतं. तर त्यांच्या शेजारी बसलेल्याला माणसाच्या हातातही तुटलेल्या खिडकीच्या काचा घुसल्या. या हल्ल्यानंतर आता किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांवर गंभीर आरोप केलेत. मला जीवे मारण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
ठाकरेंनी गुंड पाठवले…
आपल्या नावावर बोगस एफआयआर लिहिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या एफआयआरविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी किरीट सोमय्या आज खार पोलीस ठाण्यात गेलेत. तत्पू्र्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ठाकरेंनी पाठवलेल्या गुंडावर कारवाई होणारच. बोगस एफआयआरची स्क्रिप्ट मातोश्रीवर लिहिली गेली. माझी बोगस एफआयविरोधातली तक्रार दाखल करून घेतली पाहिजे. संजय पांडेंनी फर्जी एफआयआर मागे घेतली नाही, फर्जी एफआयआर ज्याने नोंदवली त्याच्यावर कारवाई नाही केली, तर मी उद्या राज्यपालांना भेटणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
दिल्लीला घातले साकडे
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र भाजपच्या शिष्टमंडळाने काल दिल्लीत गाठली. सोमय्यांसह भाजप आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा यांचा शिष्टमंडळात समावेश होता. किरीट सोमय्या यांनी स्पेशल टीम पाठवून हल्ल्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांच्या मदतीने हल्ला केला गेला, असा आरोप त्यांनी पुन्हा केलाय. संजय पांडे यांचं निलंबन करण्याची मागणीही त्यांनी केली.खोटी एफआयआर कुणाच्या सांगण्यावरुन करण्यात आली, याची चौकशी करा, अशीही मागणी सोमय्यांनी केली आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!