राहुल गांधी यांचा पोलिसांवर गंभीर आरोप, दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या
Rahul Gandhi and Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधानाचे संरक्षण करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा संविधान संपवण्याची आहे. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. यामुळे या घटनेला मी त्यांचा खून करण्यात आला आहे, असे म्हणणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
Rahul Gandhi and Somnath Suryawanshi: बीड अन् परभणी घटनेतील पीडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते अन् काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी परभणी आणि बीड दौरा केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला नाही तर त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या पोलिसांनीच केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्यामुळे त्यांना मारण्यात आले. ते संविधानचे संरक्षण करत होते, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी राहुल गांधी यांनी २० ते २५ मिनिटे चर्चा केली. त्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन मी अहवाल पाहिला आहे. त्यांचे व्हिडिओ पहिले आहे. फोटोग्रॉफ पाहिले आहे. ते पहिल्यावर ९९ टक्के नाही तर शंभर टक्के सांगतो त्यांचा मृत्यू पोलीस कठोडीत झाला आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांच्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे वक्तव्य केले ते खोटो बोलले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधानाचे संरक्षण करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा संविधान संपवण्याची आहे. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. यामुळे या घटनेला मी त्यांचा खून करण्यात आला आहे, असे म्हणणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
घटनेस मुख्यमंत्री जबाबदार
राहुल गांधी यांनी विचारले की या घटनेवर राजकारण होत नाही का? त्यावर राहुल गांधी संतप्त झाले. काहीही राजकारण नाही. या घटनेत ज्या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारले आहे, त्यांना शिक्षा मिळावी. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते ही या घटनेस जबाबदार आहे. पोलिसांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री खोटे बोलले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राहुल गांधी राजकीय हेतूने आले आहे. केवळ द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आल्यावर कठोर कारवाई करण्यार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.