‘ज्याने माझ्या मुलाला मारलं त्यांना….’; राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीची आई काय म्हणाली?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज परभणीत जात सोमनात सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सूर्यवंशींच्या आईने राहुल गांधींकडे पोलिसांवर गंभीर आरोप केले आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ यांच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

'ज्याने माझ्या मुलाला मारलं त्यांना....'; राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीची आई काय म्हणाली?
राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीची आई काय म्हणाली?
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 4:11 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान शिल्पाची एका माथेफिरुकडून विटंबना करण्यात आली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. या बंद दरम्यान काही समाजकंटकांनी जाळपोळ करत आंदोलनाला हिंसक वळण दिलं होतं. या घटनेनंतर पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती. यामध्ये 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुण वकिलाचादेखील समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांना कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली होती. पण ते न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीवरुन पोलिसांवर गंभीर आरोप केला जातोय. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर घरी परतत असताना ज्येष्ठ आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांचाही हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

परभणीच्या हिंसाचारानंतर अचानक झालेल्या या दोन घटनांमुळे अनेकांना धक्का बसलाय. या घटनांची दखल घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज परभणीत दाखल होत विजय सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी विजय वाकोडे यांच्याही कुटुंबियांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्यासोबत काय-काय चर्चा केली? या विषयी सोमनाथ यांच्या आईने प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधी काय म्हणाले? सोमनाथच्या आईची प्रतिक्रिया

“ज्याने माझ्या मुलाला मारलं त्यांना कठोर शिक्षा द्या. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हे मी राहुल गांधी यांच्याकडे बोलली. आमचा लवकर न्याय करा, अशी मागणी केली. ते म्हणाले, जी कायदेशीर कारवाई आहे ती होईल”, अशी प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दिली. “माझ्या मुलाची हत्या केल्याचा संशय आहे. मारहाण करुन माझ्या मुलाची हत्या केली आहे. मर्डर केल्यानंतरच माझा मुलगा मरण पावला ना? माझ्या मुलाला आजार नव्हता, किंवा काही नव्हतं. माझ्या मुलाला चार दिवस मारुन मारुन पार त्याची हाडे मोडून त्याचा जीव घेतला. शंका ही आहेच”, असं परकड मत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मांडलं.

“राहुल गांधी म्हणाले की, काय झालं? कसंकाय झालं? असं त्यांनी विचारलं. मग मी जे झालं ते सांगितलं. माझ्या मुलाला जबरदस्त मारहाण करुन त्याचे प्राण घेतले. ज्या वेळेला माझा मुलगा मेला त्यावेळेला मला कळवलं. मला 5 दिवसांपर्यंत त्यांनी कळवलं नाही. माझा मुलगा जिवंत असताना मला सांगितलं नाही. माझा मुलगा मेल्यानंतर त्यांना माझा फोन नंबर मिळाला आणि त्यांनी मला कॉल केला. तेव्हा म्हणाले की, या. तुमचा सोमनाथ मुलगा मरण पावला आहे. येऊन बॉडी घेऊन जा म्हणाले”, अशी माहिती सोमनाथ यांच्या आईने दिली.

“राहुल गांधी म्हणाले, कायदेशीर जी कारवाई व्हायची ती होईल म्हणाले. मी त्यांना बोलले की, माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या संबंधित पोलिसांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. पाच दिवसात पोलीस ठाण्यात कोण कोण पोलीस होते, त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा द्या. ते म्हणाले, होईल कायदेशीर कारवाई”, अशीदेखील माहिती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दिली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.