विवाहासाठी भरपूर मुहूर्त, सुट्ट्यांची चंगळ आणि बरंच काही, 2021 मध्ये काय काय घडणार?

आगामी नव्या वर्षात काय घडणार, या विषयी दा. कृ. सोमण यांनी माहिती दिली (Special things about 2021 year).

विवाहासाठी भरपूर मुहूर्त, सुट्ट्यांची चंगळ आणि बरंच काही, 2021 मध्ये काय काय घडणार?
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 9:28 PM

ठाणे : येत्या शुक्रवारपासून 2021 या नूतन वर्षाचा प्रारंभ होणार आहे. या नवीन वर्षात एकूण 4 चंद्र-सूर्यग्रहणे येणार आहेत. पण यापैकी आपल्या इथून एकही ग्रहण दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले. आगामी नव्या वर्षात नेमकं काय काय घडणार, या विषयी दा. कृ. सोमण यांनी माहिती दिली (Special things about 2021 year).

नव्या वर्षात 26 मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसणार नसून ते फक्त ईशान्य भारतातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक, कोलकाता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालॅंड, अरुणाचल येथून दिसणार आहे. तसेच या नूतन वर्षी 10 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, 19 नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आणि शनिवार 4 डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. पण ही तीनही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. त्यामुळे 2021 हे नूतन वर्ष ग्रहणमुक्त आहे असं म्हणता येईल.

पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर त्याला सूपरमून म्हणतात. अशावेळी चंद्र 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसतो. 2021 मध्ये मंगळवार 27 एप्रिल आणि बुधवार 26 मे रोजी असे  आकाशात दोनवेळा सुपरमून दिसणार आहे (Special things about 2021 year).

चंद्रबिंब जेव्हा एखाद्या ग्रह किंवा तारकेला झाकून टाकते त्याला पिधान युती असं म्हणतात. यावर्षी 17 एप्रिल रोजी चंद्र- मंगळ पिधान युती दिसणार आहे. मंगळ चंद्राआड जाताना दिसणार नाही पण सायंकाळी 7 वाजता मंगळ ग्रह चंद्रबिंबामागून बाहेर पडताना दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही दुर्मिळ घटना पर्वणी ठरणार आहे.

या नूतन वर्षी दरवर्षींप्रमाणे 4 जानेवारी, 22 एप्रिल, 5 मे, 20 जून, 28 जुलै, 12 ॲागस्ट, 22 ॲाक्टोबर, 17 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर रोजी रात्री आकाशातून  उल्कावर्षाव होताना पहायला मिळणार आहे. 2021 मध्ये 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी गुरू ग्रह आणि 21 फेब्रुवारी ते 16 एप्रिल शुक्र ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार  नाहीत.

2021 मध्ये 25 सुट्टयांपैकी  25 एप्रिल श्री महावीरजयंती आणि 15 ॲागस्ट स्वातंत्र्यदिन या दोनच सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. चाकरमान्यांना 23 सुट्ट्या मिळणार असल्याने सुट्टयांची चंगळ होणार आहे. एप्रिल महिन्यात आलेल्या 5 सुट्ट्यांपैकी 13 एप्रिल गुढीपाडवा आणि 14 एप्रिल डॅा. आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्या जोडून आल्या आहेत.

विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. मार्च, ॲागस्ट, सप्टेंबर, ॲाक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यात भरपूर विवाह मुहूर्त आहेत. गणेशभक्तांसाठी 2 मार्च, 27 जुलै आणि 23 नोव्हेंबर अशा तीन अंगारकी, संकष्ट चतुर्थी आलेल्या आहेत. सुवर्ण खरेदी करणाऱ्यांसाठी 28 जानेवारी, 25 फेब्रुवारी, 30 सप्टेंबर, 28 ॲाक्टोबर आणि 25 नोव्हेंबर असे 5 गुरुपुष्य योग आले आहेत.

आगामी 2021 हे नूतन वर्ष लीपवर्ष नसल्याने या वर्षात कामे करायला  फक्त ३६५ दिवसच मिळणार आहेत. तसेच सरत्या 2020 वर्षात 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता लीप सेकंद मोजला जाणार नसल्याने नूतन वर्षारंभ रात्री ठीक 12 वाजताच होणार आहे. मात्र पृथ्वीच्या गतीत होणाऱ्या बदलामुळे 30 जूनला रात्री 12 वाजता लीप सेकंद मोजला जाण्याची शक्यता असल्याचेही पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

हेही वाचा : नव्या वर्षात सुट्ट्या असूनही नाही लुटता येणार सुट्ट्यांचा आनंद! का ते जाणून घ्या…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.