उन्हाळ्याच्या सुटीसाठी रेल्वेही सज्ज, प्रवाशांसाठी अशा विशेष गाड्या

special train for pune and mumbai: पुणे-नागपूर , पुणे-दानापूर , पुणे-हजरत नुजामुद्दीन या मार्गावर ७० ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पुणे ते नागपूर दरम्यान ३८ विशेष गाड्या आहेत. दानापुरसाठी ८ तर हजरत निजामुद्दीन साथी २४ गाड्या सोडल्या जाणार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात गैरसोय टाळण्यासाठी गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या सुटीसाठी रेल्वेही सज्ज, प्रवाशांसाठी अशा विशेष गाड्या
Railway
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 1:50 PM

उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन काही जणांकडून तीन, तीन महिने आधी केले जाते. उन्हाळ्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे आरक्षण मिळत नाही. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनेक गाड्या सुरु केल्या आहे. पुणे, मुंबईतून या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेची सोय केली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोच्चुवेलीदरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे.

मुंबईत ११ एप्रिलपासून विशेष गाड्या

मुंबईतून विशेष रेल्वेच्या फेऱ्या ११ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. कोकण रेल्वेमार्गे गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून एलटीटी – कोच्चुवेली साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१४६३ ही ११ एप्रिल रोजी ते २७ जूनदरम्यान दर गुरुवारी एलटीटीवरून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.४५ वाजता कोच्चुवेली येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४६४ साप्ताहिक विशेष कोच्चुवेली १३ एप्रिल ते २९ जूनदरम्यान दर शनिवारी सायंकाळी ४.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळूरु, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम येथे थांबा दिला जाईल. या विशेष गाडीला प्रथम वातानुकूलित, २ वातानुकूलित-द्वितीय श्रेणी, ६ वातानुकूलित-तृतीय श्रेणी, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ जनरल सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पुण्यावरुन ७० विशेष गाड्या

पुणे-नागपूर , पुणे-दानापूर , पुणे-हजरत नुजामुद्दीन या मार्गावर ७० ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पुणे ते नागपूर दरम्यान ३८ विशेष गाड्या आहेत. दानापुरसाठी ८ तर हजरत निजामुद्दीन साथी २४ गाड्या सोडल्या जाणार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात गैरसोय टाळण्यासाठी गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

उन्हाळ्याच्या हंगामासाठी कोकण रेल्वेने विविध मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७ एप्रिल ते ६ जून या कालावधीत या विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.