जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम शरद पवारांच्या काळात सुरु झालं, राज ठाकरेंची जोरदार टीका

राज ठाकरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. डोंबिवली आणि ठाण्यात त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात दिसत असलेलं इतका जातीजातीत द्वेष कधीच पाहायला मिळत नव्हता. पवारांच्या काळात हे सुरु झालं असं ही ते म्हणाले.

जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम शरद पवारांच्या काळात सुरु झालं, राज ठाकरेंची जोरदार टीका
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 9:55 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात सभा घेतली. राज ठाकरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज सुरु असलेला जातीयवाद याआधी कधीही महाराष्ट्रात पाहिला नव्हता. फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनी सुरु केलं. पण आज पक्ष आणि चिन्हच ढापले जात आहेत. शिवसेना ही शिंदे किंवा उद्धव ठाकरेंची नाहीये तर ती बाळासाहेबांची आहे. तसेच राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, ‘सगळ्या राजकारण्यांनी शहरांची, जिल्ह्यांची बजबजपुरी केलीये. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका. किती महापालिका. ही माणसं आली कुठून. पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेले लोकं कुठे राहत आहेत. ती कोण आहेत, ती आलू कुठून. कोणाचं लक्षच नाही याच्याकडे. मुंब्रा काय उगच वाढतंय का. काय होईल फार फार तर मतदार मरतील. पण राजकारण्यांना वेळ नाही. मतदानासाठी फक्त जीवंत राहा दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. नंतर मग फोडाफोडी. तुम्ही दिलेले मत आता सध्या कुठे फिरतंय. माझं मत कुणाकडे आहे.’

‘जातीवर प्रत्येकाला प्रेम असतं. पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम शरद पवारांच्या काळात सुरु झालं. त्याच्या मधनं शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला. मराठवाड्यात जाऊन बघा. असं वातावरण कधी नव्हतं. मराठ्याच्या दुकानात कोणी ओबीसी जात नाही. ओबीसीच्या दुकानात मराठा जात नाही. इतकं विष पसरवलं. महापुरुष देखील जातीमध्ये वाटण्याचं काम केलं. आपण नागरिक म्हणून याचा विचार करणार की नाही करणार आहोत.’

‘आताची ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. जर आज परत तीच मंडळी परत परत निवडून आली तर महाराष्ट्राला कोणा वाचवू शकत नाही. आज जे चिखलातून जे लोकं आले आहेत ते पुन्हा निवडून आले तर त्यांना वाटेल की आम्ही जे केलं ते योग्य केलं. मग पुढे काही खरं नाही. कोणी नाही वाचवू शकत. कोण कुठच्या विचाराचा याला काहीही अर्थ राहणार नाही. सगळ्यांकडून वाटोळे झालेलं पाहिलं ना. एकदा मला संधी देऊन बघा. राज ठाकरेला जर संधी दिली तर माझ्या लोकांना तुम्ही आशीर्वादच द्याल याची मला खात्री आहे.’ असं ही राज ठाकरे म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.