तयारीला लागा; दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर
कोरोनाच्या साथीमुळे मध्यंतरी दहावी बारावीच्या फेरपरीक्षा होणारच नाहीत, असे वातावरणही निर्माण झाले होते. | ATKT exam
मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दहावीची (SSC) पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात पार पडेल. तर बारावीची (HSC) पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत घेतली जाईल. (SSC and HSC supplementary exam)
दरवर्षी या पुरवणी आणि श्रेणीसुधार परीक्षा ऑक्टोबर महिन्यात पार पडतात. त्यामुळे या परीक्षांना ऑक्टोबरच्या परीक्षा म्हणूनही संबोधले जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या साथीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तेव्हापासून विद्यार्थी आणि पालक परीक्षा कधी होणार, याकडे डोळे लावून बसले होते.
कोरोनाच्या साथीमुळे मध्यंतरी दहावी बारावीच्या फेरपरीक्षा होणारच नाहीत, असे वातावरणही निर्माण झाले होते. परंतु, काही दिवसांतच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा दिवाळीनंतर होतील, असे स्पष्ट केले. त्यानुसार आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी मिळत होती. यानुसार दहावी, बारावीचा निकाल साधारणपणे मे महिन्यात जाहीर झाल्यानंतर तत्काळ जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. पण यंदा परीक्षांचे निकालच मुळात जुलै महिन्यात लागल्याने या फेरपरीक्षाही झाल्या नाहीत. परिणामी यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी मिळालेली नाही.
संबंधित बातम्या:
दहावी-बारावीची ATKT परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय : वर्षा गायकवाड
नापास विद्यार्थ्यांनाही दहावी-बारावीत प्रवेशाची संधी, व्हिडिओ कॉलवर तोंडी परीक्षा
नातींकडून प्रोत्साहन, इचलकरंजीचे आजोबा दहावी उत्तीर्ण, वयापेक्षा अधिक टक्के
(SSC and HSC supplementary exam)