SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra : दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.  (SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra exam will be held offline)

SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra : दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
Student
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 3:37 PM

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.  (SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra exam will be held offline)

वर्षा गायकवाड यांच्या महत्त्वपूर्ण घोषणा 

?दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार

?लेखी परीक्षा ही विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच होणार

?वर्गखोल्या कमी पडल्या बाजूच्या शाळेत बैठक व्यवस्था केली जाणार

?यंदा 80  गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटं वाढीव वेळ

?40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार

?दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं

?प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने

?जर विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी विशेष परीक्षेचे आयोजन

?विशेष परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार

लेखी परीक्षा शाळेतच होणार

कोरोनामुळे हे लेखी परीक्षा ही तुम्ही शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जाईल. जर वर्ग कमी असल्यास इतर शाळेत बैठक व्यवस्था केली जाईल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

तसेच यंदा 80  गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटं वाढीव वेळ दिला जाणार आहे. तर 40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वाढवून दिली जाणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं वाढवून देणार आहे.

प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने

दहावीच्या प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा विशिष्ट लेखन कार्य (असाईनमेंट)  पद्धतीने घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने द्यायचे आहेत. हे असाईनमेंट 21 मे ते 10 जूनपर्यंत शाळेत द्यायचे आहे. तर बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 22 मे ते 10 जून यामध्ये होतील. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर 15 दिवसात असाईनमेंट सादर करायचे आहेत.

मात्र 12 वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर 15 दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावी लागणार आहेत.

10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार

दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या: 

SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra Guidelines : यंदा स्वतंत्र केंद्र नाही, शाळेतच परीक्षा, नियमावली जरुर वाचा

… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा(Opens in a new browser tab)

(SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra exam will be held offline)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.