10वी, 12वीच्या निकालाची मोठी बातमी! 10 जून रोजी 12चा निकाल, तर 10वीचा निकाल कधी? वाचा
SSC Result 2022 HSC Result 2022 : नियोजनानुसार कामकाज पूर्ण झालं, तर निकाल वेळेत लागतील असं सांगितलं जातंय.
मुंबई : दहावी (SSC Result 2022) आणि बारावीचा बोर्डाचा निकाल (HSC Result 2022) कधी लागणार, याकडे विद्यार्थी पालकांचं लक्ष लागलेलं आहे. परीक्षा झाल्यानंतर निकालाची उत्सुकता लागलेल्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्या तारीख जाहीर करण्यात आली आहे. 10 जून रोजी बारावीचा निकाल लागण्याती शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा 20 जून रोजी लागू शकतो, असं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटलंय. सध्या पेपरांची तपासणी सुरु आहे. 70 टक्के उत्तरपत्रिकांचं काऊंटर स्कॅनिंगहही पूर्ण झालं आहे. नियोजनानुसार कामकाज पूर्ण झालं, तर निकाल याच दिवशी लागतील असं सांगितलं जातंय. दहावी आणि बारावीच्या निकालात अवघ्या 10 दिवसांचा फरक आहे. आधी बारावीचा निकाल लागेल. त्यानंतर दहा दिवसांच्या फरकानं दहावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निकालाची उत्सुकता
मुंबई शिक्षण मंडळात बारावीच्या एकूण 18,92,929 उत्तरपत्रिका तपासणी आहेत. तर दहावीच्या एकूण 33,20,207 उत्तरपत्रिका तपाणीसाठी आहेत. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 1651 तर दहावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी 2605 मॉडरेटर आहेत. बहुतांश मॉडरेटर्सकडून उत्तरपत्रिका तपासण्याचं काम पूर्ण झालंय. तर उरलेल्यांचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळतेय.
4 मार्चपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यात 14,85,826 इतके विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या बोर्ड परीक्षेला 16,39, 172 विद्यार्थी सामोरं गेले होते.
बहिष्काराचा परिणाम शून्य…
खरंतर राज्यातील विनाअनुदानि शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या तपासण्यांचं काम करण्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र या बहिष्काराचा कोणताही परिणाम निकालावर लागण्याची आता कोणतीही शक्यता नसल्याचं सांगितलं जातंय. सुरुवातीला दहावी बारावीचा निकाल हा विनाअनुदानित शिक्षकांनी तपासण्यांचं काम नाकारल्यामुळे उशिरा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र बोर्डाच्या अचूक नियोजनामुळे पेपर तपासणीचं काम विनाअडथळा सुरु असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
अकरावी प्रवेशाबाबत महत्त्वाचं
अकरावी प्रवेश प्रक्रियेचं संभाव्य वेळापत्रकही नुकतच जारी करण्यात आलं होतं. शिक्षण विभागाकडून हे वेळापत्रक जारी करण्यात आलेस. गेल्या अनेक दिवसांपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न होते. अखेर आता जारी करण्यात आलेल्य संभाव्य वेळापत्रकामध्ये महत्त्वपूर्ण तारखांबाबत माहिती देण्यात आलीय. राज्यात अकारवीच्या प्रवेशासाठी नेमका कुठे, कधी, आणि कसा अर्ज करायचा, यासोबत अनेक प्रश्न पालकांच्या मनात आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.