हृदयविकाराच्या धक्क्याने एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, कारवाईच्या भीतीने होता तणावात

आपल्यावरही कारवाई होणार या भीतीतून हृदयविकाराचा झटका आल्याने एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. अनिल मारुती कांबळे असे या मृत एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हृदयविकाराच्या धक्क्याने एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, कारवाईच्या भीतीने होता तणावात
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 10:34 AM

कोल्हापूर – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमीका कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. वारंवार विनंती करून देखील संप मागे घेतला जात नसल्याने आता राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेकांना निलंबित देखी करण्यात आले आहे. दरम्यान आपल्यवरही कारवाई होणार या भीतीतून हृदयविकाराचा झटका आल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. अनिल मारुती कांबळे असे या मृत एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सावंतवाडी आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत

अनिल कांबळे हे 2015 साली एसटी महामंडळामध्ये रुजू  झाले होते.  सध्या ते सावंतवाडी आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने ते आपल्या मूळ गावी मडीलगे खुर्दला परतले होते. वारंवार विनंती करून देखील संप मागे घेतला जात नसल्याने, अखेर सरकारकडून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आपल्यावरही कारवाई होईल अशी भीती कांबळे यांना वाटत होते. कारवाईच्या भीतीमुळे ते तणावात होते. अति तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कांबळे यांच्या मृत्यूमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त हेत आहे.

अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन

परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत क दर्जा द्यावा, महागाई भत्त्यामध्ये वाढ करावी, अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे. मात्र जोपर्यंत एसटीचे विलनिकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांचे निलंबन देखील करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

Pune Fire | हडपसरमध्ये गोडाऊनला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट

मिलिंद तेलतुंबडेसह काही लाखांचे इनाम डोक्यावर असलेले नक्षली ठार, वाचा ठार झालेल्यांची संपूर्ण यादी

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.