ST Strike | औरंगाबाद, सोलपुरातही 23 जणांचे निलंबन, ‘मागे हटणार नाही,’ एसटी कर्मचारी संपावर ठाम

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील 15 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. तर सोलापुरातदेखील आता आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय. राज्यात आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे निलबंन राज्य सरकारने केले आहे.

ST Strike | औरंगाबाद, सोलपुरातही 23 जणांचे निलंबन, 'मागे हटणार नाही,' एसटी कर्मचारी संपावर ठाम
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 7:46 AM

औरंगाबाद : गेली 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही संपकऱ्यांची मुख्य मागणी आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय. तर ऐण सणासुदीत प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे राज्य सरकारने मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा धडाका लावलाय. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील 15 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. तर सोलापुरातदेखील आठ कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आलीय. राज्यात आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे निलबंन राज्य सरकारने केले आहे.

औरंगाबादेत 15 एसटी कर्मचारी निलंबित

राज्यभर पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप औरंगाबादेतदेखील सुरु आहे. मात्र येथील 15 संपकऱ्यांवर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये बुधवारी दहा तर मंगळवारी 5 जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून कोणतीही कारवाई केली तरी आमचे आंदोलन सुरुच राहील अशी भूमिका संपकऱ्यांनी घेतली आहे.

सोलापुरात आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई

तर दुसरीकडे सोलापूर आगारातील 8 एसटी कर्मचाऱ्यांचेदेखील निलंबन करण्यात आलेय. या एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयाच्या बाहेर जाऊन आक्रोश केला होता. सोलापुरातील जवळपास 200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला होता. या कारवाईनंतर आता राज्य सरकारवर टीका होत असून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आम्ही संपावर कायम राहणार आहोत, अशी भूमिका सोलापुरातील कर्मचाऱ्यांनीदेखील घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 27 कर्मचाऱ्यांचे निलंबन

रत्नागिरी विभागानेदेखील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येथे एकूण 27 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले  आहे. आलेल्या आदेशानुसार येथील स्थानिक प्रशासनाने ही कारवाई केलीय. मागील तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची चाकं थांबलेली आहेत. या काळात येथे एसटी महामंडळाचे कोट्यवधीने नुकसान झालंय. संप मागे घेण्याचे राज्य सरकारकडूनआवाहन केले जातेय. मात्र, काहीही झालं तरी मागण्या मान्या झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे.

इतर बातम्या :

महाराष्ट्र हादरला ! शिकाऊ डॉक्टरची हत्या, महाविद्यालयातच आढळला मृतदेह

VIDEO: जेव्हा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची अडीच वर्षांची मुलगी फेसबुक लाईव्हच्या मध्ये येते! बघा हा मजेदार आणि भावपूर्ण संवाद

भारतात पेट्रोल कार इतक्‍याच स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार, काय आहे नितीन गडकरींचा प्लान?

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.