Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी संपाला नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, भाजप, मनसेचा पाठिंबा; प्रवाशांची कोंडी

राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता खासगी वाहतूकही बंद असल्याने जिल्ह्यातून बाहेर पडणे आणि बाहेरून जिल्ह्यात येणे अत्यंत जिकरीचे झाले आहे.

एसटी संपाला नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, भाजप, मनसेचा पाठिंबा; प्रवाशांची कोंडी
नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे.
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 6:05 PM

नाशिकः राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता खासगी वाहतूकही बंद असल्याने जिल्ह्यातून बाहेर पडणे आणि बाहेरून जिल्ह्यात येणे अत्यंत जिकरीचे झाले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पगारवाढ करावा, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत घेण्यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. हा संप सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन या संपाला तसेच कर्मचाऱ्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देत आहे, असे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी कळविले आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने नाशिक येथे एसटी कर्मचारी कृती समितीस आपले पाठिंबा पत्र दिले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड, सुभाष जांगडा, विशाल पाठक, दीपक ढिकले, सिद्धेश्वर साळुंके आदी उपस्थित होते. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिलेल्या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. बाहेर मजुरी काम करणाऱ्या मजुरापेक्षा देखील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा अतिशय कमी आहे. अनेक वर्षांपासून एसटी कर्मचारी सातत्याने विविध मागण्या मांडत असून, अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने एसटी कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत आहेत. या सर्व अडचणीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले आहे. ही राज्याच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे. अशा प्रकारची पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये. त्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे. एसटी कर्मचारी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या योग्य मागण्यासाठी लढा लढत आहेत. या लढ्यास सर्वांचा पाठिंबा आहे. सर्व संघटना व नागरिक आपल्या पाठीशी आहे. आपण मांडत असलेल्या मागण्या अतिशय रास्त असून सरकारला त्याचा विचार करावाच लागणार आहे. आपल्या या आंदोलनास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करत असून आम्ही आपल्या सोबत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांचे निलंबन सुरूच

नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात कुठेही लालपरी धावताना दिसत नाही. गेल्या दोन दिवसांत नाशिक शहरातील तब्बल 57 एसटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने निलंबित केले आहे. दुसरीकडे महामंडळाने कळवण आगारातील 17, मालेगाव आणि नांदगाव आगारातील 10-10 कामगारांना निलंबित केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.

भाजप, मनसेचा पाठिंबा

नाशिक एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाला भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी नाशिकच्या विभागीय डेपोत बसलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. इतकेच नाही, तर येणाऱ्या अधिवेशनात याविषयीचा मुद्दा आपण सभागृहात मांडू, असे आश्वासन सीमा हिरे यांनी या आंदोलकांना दिले. इगतपुरी आगरातील 285 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, संपाने इगतपुरी आगाराचे आतापर्यंत अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

नाशिकची चोहोबाजूने कोंडी

नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशननेच संपाला पाठिंबा दिल्यामुळे नाशिक बाहेर वाहतूक करणाऱ्या वाहनांनी प्रवासी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाशिकमध्ये येणे किंवा नाशिकहून बाहेर जाण्यासाठी फक्त रेल्वेचा पर्याय आहे. अथवा स्वतःचे वाहन असले तर जाता येत आहे. यामुळे जे नोकरदार बाहेरगावी गेले आहेत, त्यांना नाशिकला येणे जिकरीचे झाले आहे. सरकारने लवकरात लवकर संपाची कोंडी फोडावी, अशी मागणी होत आहे. (ST strike supported by Nashik District Transport Association, BJP, MNS)

इतर बातम्याः

प्रख्यात हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर दसककर यांचे नाशिकमध्ये निधन

महापालिकेआधीच 14 बाजार समित्यांमध्ये निवडणुकीचे जंगी सामने; नाशिक जिल्ह्यात मतदार याद्या प्रसिद्ध!

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.