पगारवाढीच्या निर्णयाला एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध, परळीत एकजुटीची सामूहिक शपथ
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय संपाचा तिढा सुटाणार नाही, अशा इशारा परळी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. विलिनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी सामूहिक शपथ कर्मचाऱ्यांनी घेतली.
संभाजी मुंडेः बीड(परळी): एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या प्रकरणी न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ देण्याचा पर्याय राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसमोर मांडला. मात्र सरकारच्या या निर्णयालाही कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय या तिढा सुटणार नाही, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. परळीत कर्मचाऱ्यांनी यासाठी सामुहिक एकजुटीची शपथ घेतली.
परळी आगारात सामुहिक एकजुटीची शपथ
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय संपाचा तिढा सुटाणार नाही, अशा इशारा परळी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. विलिनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी सामूहिक शपथ कर्मचाऱ्यांनी घेतली. ही मागणी मान्य होत नसेल तर लढा आणखी तीव्र करावा लागणार, सरकारने ठरवलं तर एका दिवसात मार्ग काढता येईल. परंतु सरकार काहीच करत नसल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ
आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा केली. यावेळी मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे उपस्थित होते. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलिनीकरणाचा निर्णय समितीने सरकारकडे दिला तर तो मान्य असेल मात्र तोपर्यंत हा संप कायम ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येईल, असं अनिल परब यांनी सांगितलं.
इतर बातम्या-