Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

St Worker Protest : पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कट, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा

पवारसाहेबांवर हल्ला करुन राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होता का? पवारसाहेबांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.

St Worker Protest : पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कट, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा
राष्ट्रवादीचा हल्ल्यावरून कडकडीत इशाराImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 4:36 PM

मुंबई : पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून (St Worker Protest) आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. पवारसाहेबांवर हल्ला करुन राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होता का? पवारसाहेबांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान आमच्या बलस्थानावर झालेल्या हल्ल्याची राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. हा हल्ला राजकीय प्रेरीत असेल तर आणि राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न असेल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशाराही महेश तपासे यांनी यावेळी दिला. पवारसाहेब यांच्या निवासस्थानी जो भ्याड हल्ला झाला. त्यामध्ये आरोपींना अटक झाली आहे परंतु पवारसाहेबांच्या घरावर हल्ला करुन राजकीय अस्थिरता (Mahavikas Aghadi) निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय हा खरा प्रश्न आहे असेही महेश तपासे म्हणाले.

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

पवारसाहेबांनी कालच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत कसे संबंध आहेत हेही सांगितले आहे. मात्र आज एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करत आहे त्यांनीच विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला. आपल्यावर कुणी दगड भिरकावला तरी महात्मा गांधी यांच्या शिकवणीप्रमाणे सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते त्याप्रमाणे आज राज्यभर व गोव्यातही महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या पट्टया बांधून कालच्या घटनेचा निषेध केला आहे. एकंदरीत राज्याचे वातावरण अस्थिर करण्यासाठी केलेला हा हल्ला होता. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे स्वागत केले. पेढे वाटून आनंद व्यक्त केला. न्यायालयाचे स्वागतही केले त्यामुळे ते दगड उचलतील का? असा सवालही महेश तपासे यांनी केला.

पवारांचा दौरा पावसामुळे रद्द

पवारसाहेबांचा आजचा सातारा दौरा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रद्द केला आहे. मात्र उद्या पवारसाहेब नागपूर दौर्‍यावर आहेत अशी माहितीही महेश तपासे यांनी दिली. भाजपचे अनिल बोंडे हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. जनतेला भडकावणे हे काम अनिल बोंडे सातत्याने करत आले आहेत. कालच त्यांनी या घटनेवर भाष्य केले होते. त्यामुळे कालच्या घटनेची पूर्व कल्पना अनिल बोंडे यांना होती का? हिंसक हल्ल्याला त्यांचा पाठिंबा होता का? हेही तपासले पाहिजे असा सवाल करतानाच याचीही चौकशी व्हावी अशी मागणी महेश तपासे यांनी केली. राज्यात राजकीय क्लेश निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र गृहमंत्रालय यावर लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र सुरक्षित रहावा. भडकावू भाषण कोण करत असेल तर असं करुन महाराष्ट्र अस्थिर करु नका अशी हात जोडून विनंती महेश तपासे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात विलिनीकरणाचा कोणताही मुद्दा नव्हता तर एसटीचे आधुनिकीकरण करु असे म्हटले आहे. पडळकरांना मराठी नीट वाचता येत नाही त्यांना मराठीतील जाहीरनामा वाचण्यासाठी पाठवून देऊ असेही महेश तपासे म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण आणि ओबीसी सेलचे उपाध्यक्ष राज राजापूरकर उपस्थित होते.

Pune Ajit Pawar : ‘…नाही तर मी अधिकाऱ्यांना खडसावतो, कारण आपण जनतेला बांधील’

Pravin Darekar : सोमय्यानंतर प्रवीण दरेकरांनाही पोलिसांची नोटीस, मुंबै बँक प्रकरणात पुन्हा चौकशी होणार

St Worker Protest : गृहखात्यासाठी भाजपवर आरोप करणाऱ्यांचाच हात? हल्ल्याच्या आरोपावरून मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.