St Workers Agitation : पवारांच्या घरावरील दगडफेकीमागे कर्ते करविते कोण? ताब्यात घेऊन कारवाई करा-जयंत पाटील

महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे, अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निषेध व्यक्त केला आहे.

St Workers Agitation : पवारांच्या घरावरील दगडफेकीमागे कर्ते करविते कोण? ताब्यात घेऊन कारवाई करा-जयंत पाटील
दगडफेकीमागे कोण? ताब्यात घ्या-जयंत पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 5:38 PM

मुंबई : एसटीच्या विलीनीकरणात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांनी अडथळा आणल्याचा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर आज आंदोलन (St Worker Strike) केले आहे. यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी नेतेही आता आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहेत. महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे, अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटलांचे ट्विट

असे कधीच घडले नाही

आदरणीय शरद पवारसाहेबांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. काल न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवारसाहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

मंत्री धनंजय मुंडे यांनीही यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.  पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजूनं उतरलेले आहेत. कुठलंही आंदोलन नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. घरावर दगड फेकून, चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. या कर्मचाऱ्यांना कदाचित हा इतिहासही माहीत नाही का. की अनेक वर्ष आपली हयात घातली…आणि त्यांच्याच घरावर झालेलं हे आंदोलन संशयास्पद आहे. एकीकडे जल्लोष झाला आझाद मैदानात आणि दुसरीकडे चिथावणीखोर भाषणं सुरु होती. लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचं काम सुरु आहे की काय, असा हा प्रकार आहेत, अशी प्रतिक्रिया या आंदोलनावर धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

ST Andolan Mumbai : कुठली तरी अज्ञात शक्ती, राऊतांची पहिली प्रतिक्रिया, पवारांच्या मुंबईतल्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

ST Andolan Mumbai: हा तर माझ्या घरावर हल्ला, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सुप्रिया सुळेंनी हात जोडले

ST Strike: ‘माझे आईवडील, मुलगी आतमध्ये आहेत, प्लीज…’ एसटी कर्मचाऱ्यांचा सुप्रिया सुळेंना घेराव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.