st strike in maharashtra: एसटी आंदोलनाला वाढते बळ, नाशिकसह येवला, मनमाड, मालेगाव, नांदगावमधील कर्मचारी संपावर

नाशिक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळत असून नाशिक आगार एकसह मनमाड, मालेगाव, नांदगावमधील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

st strike in maharashtra: एसटी आंदोलनाला वाढते बळ, नाशिकसह येवला, मनमाड, मालेगाव, नांदगावमधील कर्मचारी संपावर
नाशिक जिल्ह्यात एसटी संपाला प्रतिसाद मिळत असून येवल्यातले कर्मचारी संपावर गेले आहेत.
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 12:44 PM

नाशिकः जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळत असून नाशिक आगार एकसह मनमाड, मालेगाव, नांदगावमधील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने सर्वसामान्यांची मोठी कोंडी झाली आहे. नाशिक विभागातील सर्वच्या सर्व 13 डेपोतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाशिकमधील एन.डी. रोडवरील आगार क्रमांक 1 मधील कर्मचाऱ्यांनी काल दुपारपासून अचानक कामकाज बंद करून संघर्ष युनियनची स्थापना केली आणि ते आंदोलनात सहभागी झाले. या युनियनचे अनेक सभासद प्रत्येक डेपोत आहे. त्यामुळे नाशिक जिल्हात या आंदोलनाला धार येणार आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपानुसार येवला आगारातील कर्मचारीही मध्यरात्रीपासून संपात सहभागी झाले. यामुळे येवला आगारातून सुटणारी बस वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीत आपल्या घरी आलेल्या प्रवाशांचे नोकरीच्या ठिकाणी जाताना प्रचंड हाल सुरू आहेत.

मनमाडसह मालेगाव, नांदगाव येथील एसटी कामगारांनी मध्यरात्रीपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरू करून संप पुकारला आहे. या संपामुळे बस स्थानकावर शुकशुकाट पसरला असून, एक ही गाडी आगारातून निघालेली नाही. या संपाचा सर्वात जास्त फटका रोज बस ने अपडाऊन करणाऱ्या नोकरदारांसह प्रवाशांना बसतो आहे. आम्ही जो संप पुकारला आहे, तो कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंजा पगारावरून आहे. या पगारात आमचा प्रपंच चालत नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून, ती वेळ आमच्यावर येऊ नये आणि एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

प्रवाशांची गैरसोय

एसटी आंदोलनामुळे राज्यभरातल्या प्रवासांची गैरसोय सुरू आहे. अनेक चाकरमानी दीपावली सुट्टीसाठी कुटुंबासह गावी गेले आहेत. त्यांना नोकरीच्या ठिकाणावर परतता येत नाही. त्यामुळे ते ठिकठिकाणच्या एसटी आगारावरच अडकून पडले आहेत. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत साऱ्यांची फरपट सुरू आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करून त्यांचीही त्रासातून सुटका करावी, अशा सूर प्रवाशांमधूनही उमटताना दिसतो आहे. (ST workers in Manmad, Malegaon, Nandgaon along with Nashik depot on strike from midnight)

इतर बातम्याः

घरोघरी लसीकरणाला आजपासून नाशिकमध्ये सुरुवात; महानगरासह जिल्ह्यात राबवणार मोहीम, 474 केंद्रांची सोय

चोरट्यांचा दिवाळीबारः नाशिकमध्ये घरफोडी करून मोत्याचा हार, सोन्या-चांदीचे दागिने, ताट-वाट्या लंपास

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.