माजी परिवहन आयुक्तांचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला, तर कर्मचाऱ्यांच्या वाऱ्यावर सोडू नका, राज्य सरकारलाही आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यास राज्य सरकारनं लवकरात लवकर मान्य कराव्यात, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीत वाढ झाली नाही, त्यांना सुविधाही मिळाल्या नाहीत. म्हणून त्यांच्याकडून मागणी केली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

माजी परिवहन आयुक्तांचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला, तर कर्मचाऱ्यांच्या वाऱ्यावर सोडू नका, राज्य सरकारलाही आवाहन
महेश झगडे, माजी परिवहन आयुक्त
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 2:37 PM

पुणे : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवरुन एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही सहभागी झाले आहेत. तर परिवहन मंत्री अनिल परब संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करत आहेत. अशावेळी माजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महत्वाचा सल्ला दिलाय. त्याचबरोबर राज्य सरकारलाही महत्वाचं आवाहन केलं आहे. (Mahesh Zagde’s advice to ST employees and appeal to Thackeray government)

एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी कर्मचाऱ्यांनी जास्त काळ लावून धरु नये. राज्य शासनात महामंडळाचं विलिनीकरण शक्य नाही आणि विलिनीकरण करु नये, असं महेश झगडे यांनी म्हटलंय. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यास राज्य सरकारनं लवकरात लवकर मान्य कराव्यात, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीत वाढ झाली नाही, त्यांना सुविधाही मिळाल्या नाहीत. म्हणून त्यांच्याकडून मागणी केली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

‘एसटी महामंडळाचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान’

संपूर्ण देशभरात सगळ्या सेवा या खासगीकरणाकडे चालल्या आहेत. रेल्वे, एअर इंडिया, एमएसईबी यामुळे राज्य शासनात विलिनीकरण शक्य नाही. राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. एसटी महामंडळाचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन कर्मचाऱ्यांना काय देता येईल ते बघायला हवं, असंही झगडे म्हणाले.

अनिल परबांचा भाजपला सवाल

परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आम्हाला काही एसटी बंद ठेवण्यात किंवा खाजगी बसेसना स्टँडवर आणण्यात रस नाही. एसटी कामगार राजकारणाचे बळी ठरत आहेत. आज त्यांची भाषा पाहिली तर संप चिघळवण्याचे काम ते करत आहेत, असं सांगतानाच त्यांच्या काळात एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल परब यांनी केला. त्यावेळी राज्याची आणि एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. एसटी व्यवस्थित धावत होती. आज जे मागणीसाठी जोरजोरात बोलत होते त्यांचं तर सरकार तेव्हा होतं. केंद्रातही त्यांचंच सरकार होतं. तेव्हा त्यांनी एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच आज थातूरमातूर उत्तर देणाऱ्यांनी पूर्ण व्हिडीओ दाखवावाच, असं आव्हानच त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना दिलं.

इतर बातम्या :

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची NIA चौकशी व्हावी, चंद्रकांत पाटील यांची मागणी

VIDEO: आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करणार नाही, आधी आत्महत्या थांबवा; राज ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Mahesh Zagde’s advice to ST employees and appeal to Thackeray government

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.