मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता, चार बडे नेते नाराज, एकाचा थेट राजीनामा

मोठी बातमी समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजीचा भडका उडाला आहे. चार बडे नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता, चार बडे नेते नाराज, एकाचा थेट राजीनामा
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 4:05 PM

रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात आधी मंत्री असलेल्या अनेक बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील नेते अस्वस्थ असल्याची बातमी समोर येत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला. त्यांचं पक्षात काहीच योगदान नाही अशांंना देखील मंत्रिपद मिळालं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना देखील मंत्रिपद मिळालं, जर मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे.

दरम्यान नरेंद्र भोंडेकर यांच्याप्रमाणाचे विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे, विजय शिवतारे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. विश्वासात न घेता मंत्रिमंडळ विस्तार झाला, आता आडीच वर्षांनी जरी मंत्रिपद मिळालं तरी मी घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे  प्रकाश सुर्वे देखील नाराज आहेत.

तानाजी सावंत यांच्याकडे गेल्यावेळी आरोग्य खातं होतं. मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज झाले आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या  हिवाळी  अधिवेशनाला न थांबता ते पुण्यातील बालाजी नगर येथील कार्यालयात परतले आहेत. माध्यमांसमोर येण्यासाठी तानाजी सावंत यांनी नकार दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज आहे, आता त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी दूर करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.