…अखेर राज्य नाट्य स्पर्धेला मुहूर्त, कोरोनामुळे लागला होता ‘ब्रेक’

गतवर्षी कोरोनामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हे रद्द करण्यात आले होते. त्यामुळे हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालायमर्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये गतवर्षी खंड पडला होता.

...अखेर राज्य नाट्य स्पर्धेला मुहूर्त, कोरोनामुळे लागला होता 'ब्रेक'
अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य मंत्री
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 5:33 PM

मुंबई : गतवर्षी कोरोनामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हे रद्द करण्यात आले होते. त्यामुळे हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालायमर्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये गतवर्षी खंड पडला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झाला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या हीरक महोत्सवी व देशाच्या अमृत महोत्सवी तसेच स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढविण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालायमर्फत या स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे राज्याबाहेरील व देशाबाहेरील मराठी रंगकर्मींना या स्पर्धेचा लाभ घेता येईल व मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल,असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेत एक हजार संघ सहभागी होतात.

सर्व संघांच्या माध्यमातून जवळपास 20 हजार कलाकार वीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. मात्र, गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा घेणे शक्य नव्हते. अनेक रंगकर्मी, संस्था, संघटना यांनी या स्पर्धा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्या अनुशंगानेच कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन डिसेंबर पासून संपूर्ण राज्यात नेमून दिलेल्या केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन

मराठी हौशी नाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, हिंदी नाट्य स्पर्धा, दिव्यांग नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील रंगकर्मींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून, प्रयोग सादर करावेत असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आवाहन केले आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा समारंभ

दोन वर्षापूर्वी झालेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अद्यापही घेण्यात आलेला नाही. या कार्यक्रमालाही कोरोनाचाच अडसर होता. मात्र, आता स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे या स्पर्धा पार पडल्या की लवकरच बक्षीस विरतणाचा कार्यक्रमही पार पडणार असल्याचे मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या :

दिल तो बच्चा है जी…!! ‘मी होणार सुपरस्टार’च्या निमित्ताने दिग्गजांनी देखील परिधान केला शाळेचा गणवेश

‘माझी चूक सिद्ध करून दाखवा, पद्मश्री पुरस्कार परत करेन’, ‘त्या’ वादग्रस्त विधानावर कंगना ठाम!

‘आला आला आला आला खुर्चीचा राजा आला..’, सत्तेच्या ‘खुर्ची’त विराजमान होणार चिमुकला अभिनेता!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.